वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पोलाद उद्योगाने भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या ईसीटीए कराराचा सर्वोत्तम वापर करावा आणि ऑस्ट्रेलियामध्ये नवीन संधी संपादन कराव्यात असे केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे आवाहन

Posted On: 22 NOV 2022 5:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2022

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण आणि वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी पोलाद उद्योगाला, भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार कराराचा (ईसीटीए) सर्वोत्तम वापर करण्याचे आणि ऑस्ट्रेलियातील नवी संधी संपादन करण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. ते आज नवी दिल्ली येथे तिसऱ्या आयएसए पोलाद परिषदेला संबोधित करत होते. 

उपस्थितांना संबोधित करताना गोयल यांनी सांगितले की भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार (ईसीटीए) ऑस्ट्रेलियाच्या संसदेने पारित केला आहे. ऑस्ट्रेलियात निर्यात होणारे सर्व पोलाद निर्यात शुल्क मुक्त होईल, हे त्यांनी यावेळी अधोरेखित केले. ते म्हणाले की विकसित देशांबरोबरचे हे व्यापारी करार आपल्या युवा वर्गासाठी आणि विविध क्षेत्रांतील व्यवसायांसाठी नवीन संधी निर्माण करतील. गोयल यांनी, पोलाद उद्योगात लक्षणीय वाढीची क्षमता असल्याचे मत व्यक्त केले आणि 2030 पर्यंत 300 दशलक्ष टनांचे उद्दिष्ट साध्य करण्याचे आवाहन केले. आगामी काळातील मोठ्या गुंतवणुकीमुळे पोलाद उद्योगाची भरभराट आणि वाढ होतच राहील असे ते म्हणाले. ते म्हणाले की, पोलादाचे मोठे उत्पादक असलेले इतर अनेक देश गंभीर तणावाचा सामना करत असताना, मोठी देशांतर्गत बाजारपेठ, स्पर्धात्मक किमती, आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादनांची विस्तृत श्रेणी आणि देशांतर्गत लोहखनिज क्षमता, या स्वरुपात भारतासाठी मोठी संधी उपलब्ध आहे.

भारताचा पोलादाचा दरडोई वापर जागतिक सरासरीपेक्षा खूपच कमी असल्याचे गोयल यांनी नमूद केले आणि जागतिक सरासरी गाठण्यासाठी उद्योगाने किमान तिप्पट वृद्धीचे उद्दिष्ट ठेवावे असे आवाहन केले. 

ते म्हणाले की, वाढत्या समृद्धीबरोबर विकसित होत असलेला ईव्ही वाहन उद्योग पोलाद आणि ल्युमिनियम उद्योगाच्या वृद्धीला हातभार लावेल.    

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1878034) Visitor Counter : 154