शिक्षण मंत्रालय
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आयआयटी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पत आराखडा मसुद्यावरील विचारविनिमयात सहभागी
एनसीआरएफ आम्हाला ज्ञान आणि कौशल्याचे उपयोजित पैलू ओळखण्याची संधी प्रदान करेलः धर्मेंद्र प्रधान
Posted On:
21 NOV 2022 7:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 नोव्हेंबर 2022
केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच व्यावसायिकता विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान हे आज, आयआयटी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय पत आराखडा मसुदा ठरवण्याच्या भागधारकांच्या चर्चेत सहभागी झाले. एनसीव्हीईटी इंडियाचे अध्यक्ष डॉ. एन एस कलसी, आयआयटी दिल्लीचे संचालक प्रो. रंगन बॅनर्जी, भारत सरकारच्या शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव राकेश रंजन, शिक्षणतज्ञ आणि इतर अनेक नामवंत मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करताना प्रधान म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणात (एनईपी) 2020 ज्ञान, कौशल्य आणि रोजगार मिळवण्याची सक्षमता यातील अडथळे दूर करण्यासाठी पत आराखड्याच्या सार्वत्रिकीकरणाचा विचार केला आहे. तसेच सर्व प्रकारचे शिक्षण आणि कौशल्य प्राप्त करण्याचे मार्ग यासाठीचे निरंतर प्रयत्न यांची सुनिश्चिती करण्यासाठी पत संचय आणि हस्तांतरण व्यवस्था स्थापित करण्याचाही विचार त्यात केला आहे.
S.Patil/U.Kulkarni/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877815)
Visitor Counter : 179