माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

53 व्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) उलगडणार बालपणीची स्वप्नांची दुनिया आणि उत्साहानं भरलेली सळसळती ऊर्जा


युनिसेफ च्या सहकार्याने इफ्फी सादर करत आहे सहा बालचित्रपट

Posted On: 20 NOV 2022 10:45PM by PIB Mumbai

#IFFIWood, 20 November 2022

 

मुलं ही घडवायची गोष्ट नसून उलगडून दाखवायची माणसं आहेत, असं प्रसिद्ध अमेरिकन लेखक जेस लेअर यांनी म्हटलं आहे. बालपणीची स्वप्नांची दुनिया ,उत्साहानं भरलेली सळसळती ऊर्जा,  बालपण आणि त्याच्या सामाजिक-आर्थिक संदर्भांना आकार देणारे बारकावे यांचे चित्रपटाच्या माध्यमातून केलेले सादरीकरण दाखवण्यासाठी 53 वा आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) सज्ज आहे.

कॅपरनौम

कॅपरनौमपासून, नानी तेरी मोरनी, म्होनबेनी इझुंग -  नागालँडमधील आठ वर्षीय म्होनबेनी इझुंग जिने नदीत बुडणाऱ्या आपल्या आजीला वाचवलं, आणि राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवणारी सर्वात युवा विजेती ठरली. इफ्फी महोत्सव युनिसेफच्या सहकार्याने अशा उत्तमोत्तम सहा बालचित्रपटांची एक अत्तराची कुपी घेऊन आला आहे.

ग्रामीण भारतावर आधारित, मालिकेतील आणखी एक चित्रपट म्हणजे सुमी. समाजातील वंचित घटकातील एका 12  वर्षांच्या मुलीची. सुमतीची ‘आशावादी आणि प्रेरणादायी कथा’ आहे, आपल्या गावापासून मैलोनमैल दूर असलेल्या शाळेत जाण्यासाठी या मुलीला हवी असते सायकल. तिची ही अतिशय माफक गरज पूर्ण करण्यासाठी, ती एका विलक्षण प्रवासाला सुरुवात करते, ज्यात  संघर्ष, महत्त्वाकांक्षा, वचनबद्धता आणि मैत्री या विविध भावभावनांचे चित्रण दिसून येते.

नानी तेरी मोरनी

दुसरा क्लासिक चित्रपट, टू फ्रेंड्स, हा 2021 चा बंगाली फीचर ड्रामा आहे, हा चित्रपट भारतातील बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर वाढत्या धार्मिक विभाजनामुळे निर्माण झालेल्या ताणतणावात मार्गक्रमण करणाऱ्या 8 वर्षांच्या दोन मुलांची कथा सादर करतो.

इफ्फीमध्ये प्रदर्शित होणारे इतर दोन बाल चित्रपट म्हणजे उड जा नन्हे दिल आणि धनक, हे आहेत.

 

U.Ujgare/B.Sontakke/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 

 (Release ID: 1877627) Visitor Counter : 44


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil