माहिती आणि प्रसारण मंत्रालय
आपल्यासमोर सादर आहे, पत्रसूचना कार्यालयाची, इफ्फीविषयक पत्रिका, इफ्फीलॉईडची दुसरी आवृत्ती
गोवा/मुंबई, 20 नोव्हेंबर 2022
पुन्हा एकदा सिनेमाचा उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. ओहह, तुम्ही नेहमीच सिनेमाचा उत्सव साजरा करता, असं म्हणताय का? अगदी आनंदाच्या प्रसंगी किंवा दु:खाच्या क्षणांमध्ये सुद्धा? जेव्हा तुम्ही जागे असता, तेव्हाही आणि जेव्हा झोपेत तुम्ही स्वप्नं बघता तेव्हाही तुम्ही सिनेमाच्या विश्वास असता का?
होय, सिनेमा, ही शाश्वत प्रेमासारखीच भावना आहे आणि म्हणूनच त्याला काळाचे काहीही बंधन नाही. त्याचा, उत्सव, त्याचा अनुभव आपण-आपण सगळे- कायमच, आपल्यासोबत घेऊन चालतो, आपल्यामध्ये तो समावलेला असतो, आतपर्यंत मुरलेला असतो.
आणि हीच सिनेप्रेमाची भावना, इफ्फी- आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाच्या मागे आहे. हा चित्रपट महोत्सव लोकांचा आहे, लोकांसाठी आहे आणि लोकांकडून साजरा केला जाणारा आहे.
आणि याच भावनेतून, पीआयबी इफ्फीचा सगळा चमू, सगळे सदस्य काम करत असतात. याच भावनेतून आम्ही आपली 53व्या इफ्फीची सगळी खबरबात देणारी आमची पत्रिका इफ्फीलॉईडचा पहिला अंक आपल्यासमोर आणत आहोत
गेल्यावर्षीचा इफ्फीलॉईड आपल्या सिनेरसिकांच्या मनाला स्पर्श करणारा ठरला होता. आणि यावर्षीची ही पत्रिका सुद्धा आपल्या सर्वांच्या पसंतीस उतरेल, आम्ही यंदा आणखी काही उत्तम देण्याचा प्रयत्न करू, अशी आम्हाला आशा आहे.
पहिला अंक बघण्यासाठी इथे क्लिक करा !
चला आपण एकत्रितपणे चित्रपट -आणि आयुष्यही—साजरे करूया !
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1877527)
Visitor Counter : 220