माहिती आणि प्रसारण मंत्रालय
ओझू, मिझोगूची आणि क्युरोसावाच्या भूमीतून
एका अॅनिमेशन पटासह तीन जपानी चित्रपटांचा इफ्फी 53 च्या माध्यमातून भारतात प्रिमिअर
गोवा/मुंबई, 19 नोव्हेंबर 2022
शंभर वर्षांहून जुन्या असलेल्या जपानी चित्रपटाने जगभरातल्या प्रेक्षकांचं लक्ष सर्व कालखंडात वेधून घेतलं आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फीनं ओझू, मिझोगूची आणि क्युरोसावा या भूमीतून प्रेक्षकांसाठी गतकाळात खजिना सादर केला आहे. टोकियोच्या युद्धाने छिन्नविछिन्न झालेल्या आठवणींचं पुनरुज्जीवन करणाऱ्या जपानी चित्रपट ‘रिंग वाँडरिंग’नं गेल्यावर्षी 52 व्या इफ्फी मध्ये गोल्डन पीकॉक वर आपली मोहोर उमटवली होती, हे विसरता येणार नाही. यावर्षी सुद्धा उगवत्या सूर्याच्या देशातून इफ्फीमध्ये तीन चित्रपटांचा प्रिमिअर होणार आहे.
‘अ फार शोअर’ (Tooi Tokoro) हा मसाकी क्यूडोनं दिग्दर्शित केलेला चित्रपट इफ्फी- 53 च्या माध्यमातून भारतात पदार्पण करत आहे. 2022 मध्ये निर्माण झालेला हा चित्रपट शाळा सोडावी लागलेल्या अओईची कथा सांगतो. जी जपानचं दक्षिणेकडचं बेट ओकिनावा इथं मसायाच्या सहवासानं एका मुलाला जन्म देते. मसाया नोकरी घालवून बसल्यानं आणि प्रापंचिक जबाबदाऱ्या पाळू शकत नसल्यानं आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी अओई एका नाईट क्लबमध्ये काम करते. मात्र, अपरिपक्वता आणि अवलंबित्व यामुळे सतत वादावादी होत राहून त्यांचे संबंध दुरावत राहून सामाजिक अधोगती होते. आपल्या आयुष्यातल्या समस्यांवर उपाय शोधत आपल्या मुलाच्या प्रेमाखातर अओई काय करते, हे जाणून घेण्यासाठी हा चित्रपट पहा.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/1Q5IA.jpg)
दिग्दर्शकांबद्दल : या चित्रपटाचा दिग्दर्शक क्युडोच्या पदार्पणातल्या I’m crazy या चित्रपटानं 2018 मध्ये बुचीओन इथ नेटपॅक पुरस्कार प्राप्त केला होता. त्याचा पुढचा ‘अनप्रेसिडेंटेड’ हा चित्रपट 2021 च्या चित्रपट महोत्सवात टॅलिन ब्लॅक नाईटस इथं प्रदर्शित झाला होता. ‘अ फार शोअर’ हा त्याचा तिसरा चित्रपट आहे.
यामासाकी जुइचिरोनं दिग्दर्शित केलेला ‘यामाबुकी’ हा दुसरा जपानी चित्रपट इफ्फीच्या माध्यमातून भारतात पदार्पण करत आहे. 2022 मधला हा चित्रपट यामाबुकी या किशोरवयीन मुलीची कथा सांगतो. पोलिसात काम करणाऱ्या वडिलांच्या दहशतीखाली यामाबुकीनं केलेली मूक निदर्शनं नंतर सामुदायिक कृतीत परावर्तित होतात. शांततापूर्ण अशा या ग्रामीण वातावरणात राहणाऱ्या शहराची शांतता हळूहळू ढवळून निघते आणि आत लपलेली निराशा आणि एकाकीपणाला हळूहळू आवाज मिळाल्यावर ते लोकांना परस्परांशी जोडायला सुरुवात करते. आयुष्यातले अडथळे तुम्हाला निराश करतात तेव्हा स्वतःच्या मुळापर्यंत जाण्याचा शोध घेणारी ही कथा आहे.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/2WZ0F.jpg)
दिग्दर्शकाबद्दल: चित्रपटाचा दिग्दर्शक यामासाकी जुईचिरोनं आपल्या महाविद्यालयीन जीवनातच विद्यार्थ्यांचा चित्रपट महोत्सव आयोजित केला होता. ओकायामा या छोट्याशा डोंगराळ प्रदेशातल्या गावात स्थलांतरित होण्यापूर्वी त्याने काही शॉर्ट फिल्म बनवल्या आणि सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. “द साऊंड ऑफ लाईट” (2011) हा त्याचा पदार्पणातला चित्रपट होता.
याशिवाय ॲनिमेशनप्रेमी साठी आनंदाची बाब म्हणजे कोजी यामामुरा याचा चित्रपटाच्या लांबीचा जपानी ॲनिमेशनपट ‘डझन्स ऑफ नॉर्थ’ (Ikuta no Kita) सुद्धा भारतात या महोत्सवात पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे. जपानच्या पूर्व भागात 2011 मध्ये झालेल्या भूकंपाच्या घटनेनंतर या भागाला सोसाव्या लागलेल्या परिणामाचा यामामुरानं चित्र आणि गद्य मालिकेतून बनवलेल्या कलाकृतीवर हा चित्रपट आधारित आहे. वास्तविक आयुष्यात पौराणिक आणि वैश्विक परिमाणांची कास धरत आधुनिक जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या समस्या आणि मानवी अस्तित्वातील मूर्खपणा आणि शोकांतिका या चित्रपटाच्या माध्यमातून आशेच्या खोलवर टोचण्यातून सांगितल्या जातात.
![](https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/3SDR3.jpg)
* * *
PIB Mumbai | H.Raut/S.Naik/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1877463)
Visitor Counter : 215