सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठीच्या (MSEs) सार्वजनिक खरेदी धोरणा संदर्भात, केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम




Posted On: 19 NOV 2022 12:53PM by PIB Mumbai

 

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने (MSME) 18 नोव्हेंबर 2022 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचे राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय अनुसूचित जाती अनुसूचित जमाती (SC-ST) केंद्राच्या अंतर्गत केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम (CPSE) परिषदेचे आयोजन केले होते. विविध सीपीएसइज (CPSEs) आणि सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठीच्या (MSEs) सार्वजनिक खरेदी धोरण आदेशानुसार अनिवार्य केलेले लक्ष्य साध्य करण्यासाठी त्यांची आव्हाने समजून घेण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला सार्वजनिक उपक्रम विभागाचे अधिकारी आणि विविध सीपीएसइज (CPSE) चे अधिकारी उपस्थित होते.

सूक्ष्म आणि लघु उद्योगांसाठीच्या (MSEs) सार्वजनिक खरेदी धोरणानुसार, केंद्र सरकारचे प्रत्येक मंत्रालय, विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम या उद्योगांकडून वस्तू किंवा सेवा त्यांच्या एकूण वार्षिक मूल्याच्या किमान 25 टक्के खरेदी करतील. याशिवाय, वस्तू आणि सेवांच्या एकूण खरेदीपैकी 4% खरेदी ही एससी (SC) आणि एसटी ( ST) उद्योजकांच्या मालकीच्या सूक्ष्म आणि लघु उद्योगांमधून आणि 3% खरेदी ही महिला उद्योजकांकडून केली जाईल.

एससी/एसटी(SC/ST) आणि महिला सूक्ष्म आणि लघु उद्योगांकडून खरेदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सीपीएसइज (CPSEs) ना अधिक कार्यशील बनवणे, त्यांना पाठिंबा देणे आणि त्यांचा सत्कार करण्यावरही या परिषदेमध्ये भर देण्यात आला.

सार्वजनिक खरेदी धोरणाच्या अध्यादेशाची पूर्तता करण्यासाठी सीपीएसइज (CPSEs) द्वारे केलेल्या प्रयत्नांचे राज्यमंत्री भानू प्रताप सिंग वर्मा यांनी कौतुक केले. सर्व सीपीएसइज(CPSEs)  ना एससी/एसटी(SC/ST)महिला उद्योजकांना सक्रियपणे मदत करण्याचे आणि त्यांना शक्य असेल तितके समर्थन प्रदान करण्याचे आवाहन केले.

***

H.Raut/V.Yadav/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1877231) Visitor Counter : 182


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu