केंद्रीय लोकसेवा आयोग
राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षा (I),2022 चे अंतिम निकाल
प्रविष्टि तिथि:
17 NOV 2022 10:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2022
- राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 149 व्या अभ्यासक्रमामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाच्या शाखेत प्रवेशासाठी आणि आणि भारतीय नौदल अकादमीच्या (INAC)111व्या अभ्यासक्रमामध्ये नौदल अकादमीमधील प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 10 एप्रिल, 2022 रोजी घेतलेली लेखी परीक्षा आणि त्यानंतर सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या 519 उमेदवारांची गुणवत्तेनुसार यादी खालीलप्रमाणे आहे. वरील अभ्यासक्रम सुरू होण्याच्या तारखेसंबंधी तपशीलवार माहितीसाठी, कृपया संरक्षण मंत्रालयाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.पुढील लिंकवर भेट द्यावी. www.joinindianarmy.nic.in www.joinindiannavy.gov.in आणि www.careerindianairforce.cdac.in.
- या याद्या तयार करताना वैद्यकीय तपासणीचे निकाल विचारात घेतलेले नाहीत.
- सर्व उमेदवारांची उमेदवारी तात्पुरती असून, जन्मतारीख आणि शैक्षणिक पात्रता इत्यादींच्या समर्थनार्थ आवश्यक प्रमाणपत्रे सादर करायची आहेत. मात्र आपण ही कागदपत्रे यापूर्वी यूपीएससीकडे दाखल केली नसल्याचा दावा, थेट भर्ती अतिरिक्त महासंचालनालय, ऍडज्युटंट जनरल शाखा, एकात्मिक मुख्यालय, संरक्षण मंत्रालय (लष्कर), पश्चिम ब्लॉक क्रमांक III, विंग-I, आर.के. पुरम, नवी दिल्ली -110066 येथे करणे आवश्यक आहे.
- पत्त्यात कोणताही बदल असेल, तर उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर थेट लष्कराच्या मुख्यालयाशी त्वरित संपर्क साधावा.
- निकाल युपीएससीच्या https://www.upsc.gov.in या वेबसाइटवरही उपलब्ध आहे. तथापि, उमेदवारांचे गुण अंतिम निकाल जाहीर झाल्यापासून १५ दिवसांनी वेबसाइटवर उपलब्ध होतील.
- अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी आयोगाच्या गेट 'सी' जवळील सुविधा काउंटरवर वैयक्तिकरित्या किंवा दूरध्वनी क्रमांक 011-23385271/011-23381125/011-23098543 वर सकाळी 10:00 ते 17:00 या वेळेत कोणत्याही कामकाजाच्या दिवशी संपर्क साधावा.
- याशिवाय SSB/मुलाखतीशी संबंधित बाबींसाठी उमेदवार टेलिफोन क्रमांक 011-26175473 वर संपर्क साधू शकतात किंवा सैन्यासाठी joinindianarmy.nic.in वर प्रथम पसंती म्हणून, तर 011-23010097/Email:officer-navy[at]nic[dot]in किंवा joinindiannavy.gov.in येथे नेव्ही/नेव्हल अकादमीसाठी पहिली पसंती म्हणून आणि 011-23010231 Extn. 7645/7646/7610 किंवा www.careerindianairforce.cdac.in येथे हवाई दलासाठी पहिली पसंती म्हणून संपर्क साधू शकतील.
निकाल बघण्यासाठी येथे क्लिक करावे:
S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1876899)
आगंतुक पटल : 247