अंतराळ विभाग
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह श्रीहरिकोटा येथून विक्रम- उपकक्षीय (व्‍हीकेएस ) रॉकेटच्या पहिल्या ऐतिहासिक खाजगी प्रक्षेपणासाठी शुक्रवारी उपस्थित राहणार

Posted On: 16 NOV 2022 9:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो ) स्वतंत्र भारताच्या 75 वर्षांतील  प्रवासामध्‍ये एक नवा ऐतिहासिक टप्पा गाठण्यासाठी सज्‍ज झाली आहे. इस्रो पहिल्यांदाच खाजगी रॉकेटचे  येत्‍या  शुक्रवारी प्रक्षेपण करणार  आहे.  याबाबत केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)  राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) पृथ्वी विज्ञान, पीएमओ, कर्मचारी, सार्वजनिक तक्रारी, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ मंत्री डॉ.  जितेंद्र सिंह यांनी आज येथे  माहिती दिली.  विक्रम-उपकक्षीय  (व्‍हीकेएस )  रॉकेटच्या पहिल्या ऐतिहासिक  खाजगी प्रक्षेपणाचे  साक्षीदार होण्यासाठी 18 नोव्हेंबर रोजी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा, येथे  डॉ जितेंद्र सिंह उपस्थित राहणार आहेत.

या रॉकेटचे 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रक्षेपण होणार आहे.  त्यापूर्वी  प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात डॉ जितेंद्र सिंह यांनी  म्हटले आहे की, दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील अंतराळ क्षेत्रामध्‍ये खाजगी सहभागाच्या दृष्‍टीने  इस्रोच्या प्रवासातील हा एक महत्त्वाचा टप्पा असेल, असे सांगितले होते. त्‍यानुसार इस्रोची वाटचाल होत आहे.

डॉ जितेंद्र सिंह  यांनी यावेळी माहिती दिली की बिगर-सरकारी संस्था/स्टार्टअप, स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (एसएपीएल) ने व्‍हीकेएस  रॉकेट विकसित केले आहे, हे  एकल 'स्टेज स्पिन स्टॅबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेटआहे.  त्याचे  वस्तुमान अंदाजे आहे. 550 किलोग्रॅम. हे रॉकेट कमाल 101 किलोमीटर उंचीवर जाऊन समुद्रात कोसळते आणि प्रक्षेपणाचा एकूण कालावधी केवळ 300 सेकंद आहे.

डॉ जितेंद्र सिंह म्हणाले कीरॉकेट लॉन्च करण्यासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार करणारे स्कायरूट हे पहिले स्टार्टअप आहे.  देशातील हे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण असणारआहे. याबरोबरच   "प्रारंभ" नावाची स्कायरूट एरोस्पेसची  पहिली  अंतराळ मोहीमही सुरू होणार आहे. यामध्‍ये  अंतराळात एकूण तीन पेलोड वाहून नेण्‍यात येतील.  या तीनमध्‍ये एका परदेशी  ग्राहक संस्थेच्या पेलोडचा समावेश आहे.

मंत्री जितेंद्र सिंह  म्हणाले, अंतराळ प्रकल्पामध्‍ये  खाजगी क्षेत्राच्या  प्रवेशातील अडथळे दूर करून किफायतशीर उपग्रह प्रक्षेपण सेवेसाठी एक समान  क्षेत्र प्रदान करेल आणि स्टार्ट-अप्सना स्पेसफ्लाइट्स स्वस्त आणि विश्वासार्ह बनविण्यात मदत करेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  भारताच्या विज्ञान, तंत्रज्ञान, नवकल्पना क्षमतांसाठी भारताला सार्वत्रिक ओळख मिळवून दिली आहे आणि आमच्या स्टार्टअप्सची खूप मागणी आहे. असे अधोरेखित करून  डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की, संपूर्ण जग भारताकडे एक प्रेरणादायी स्थान म्हणून पाहत आहे, कारण  त्यामुळे अनेक नव्‍या देशांना क्षमता निर्मितीसाठी  आणि नॅनो उपग्रहासह  इतर उपग्रह निर्मितीमध्ये भारत मदत करीत आहे.

  

S.Patil/S.Bedekar/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 

 


(Release ID: 1876622) Visitor Counter : 252


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu