वस्त्रोद्योग मंत्रालय
राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियान (एनटीटीएम) अंतर्गत टेक्निकल टेक्स्टाईल अर्थात तांत्रिक वस्त्रोद्योग "प्रोटेक" वर राष्ट्रीय परिषद
जागतिक संधी शोधण्यासाठी तसेच देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी तांत्रिक कापडांच्या स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र वचनबद्ध आहे
Posted On:
16 NOV 2022 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर 2022
वस्त्रोद्योग मंत्रालयाने नॉर्दर्न इंडिया टेक्सटाईल रिसर्च असोसिएशन (एनआयटीआरए) आणि इंडियन टेक्निकल टेक्सटाईल असोसिएशन (आयटीटीए) यांच्या सहकार्याने आज नवी दिल्ली येथे नॅशनल कॉन्क्लेव्ह ऑन टेक्निकल टेक्सटाइल – प्रोटेक ही एकदिवसीय परिषद आयोजित केली. केंद्र सरकारच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनी प्रमुख पाहुण्या म्हणून या परिषदेचे उद्घाटन केले.
संरक्षक कापड उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांच्या विविध उत्पादनांच्या प्रदर्शनाचे उद्घाटनही वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सचिव रचना शाह यांनी केले.
संरक्षक कापड उत्पादने देशातच बनवण्याच्या शक्यता, भारतीय संरक्षक वस्त्रांच्या वापराबाबत ग्राहकांचे अनुभव आणि अपेक्षा तसेच जागतिक सर्वोत्तम पद्धतींसह भारतातील बाजारपेठेतील जाहिरात आणि निर्यातीच्या संधी या विषयावर या परिषदेत तीन परिसंवाद झाले.
केंद्र सरकार आणि सुरक्षा दलातील अधिकारी आणि प्रतिनिधी , संशोधक, उद्योजक आणि प्रोटेकशी संबंधित तांत्रिक वस्त्रोद्योग व्यावसायिकांसह सुमारे 450 सहभागींनी या परिसंवादामध्ये भाग घेतला.
भारताच्या वस्त्रोद्योगाचा भारतीय अर्थव्यवस्थेत आणि भारताच्या निर्यातीत मोठा वाटा आहे. नव्याने उदयाला आलेल्या तांत्रिक वस्त्रोद्योगाच्या वाढीचा वार्षिक दर 10% आहे. हे क्षेत्र अजूनही आकाराने लहान आहे आणि जागतिक क्षेत्रात भारताला या क्षेत्रात आघाडी घेण्यासाठी भरपूर संधी आहे, असे रचना शाह यांनी यावेळी सांगितले.
उत्पादन आणि निर्यातीच्या क्षेत्रात भारत एक मोठे केंद्र म्हणून उदयास येत आहे. मात्र, उत्पादनातील वैविध्य, डिझाइन, सौंदर्यशास्त्र, तसेच संबंधित मनुष्यबळासाठी प्रशिक्षणाची गरज यावर भर देणे ही काळाची गरज आहे, असे त्या तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातील चैतन्य आणि उर्जेबद्दल बोलताना म्हणाल्या.
राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन (एनटीटीएम) अंतर्गत वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या तांत्रिक कापड वस्तूंसाठी मानके विकसित करून अंमलबजावणीसाठी आणि आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने दर्जेदार उत्पादनांचे उत्पादन आणि मार्केटिंग करण्यासाठी केलेल्या एकत्रित प्रयत्नांवर त्यांनी प्रकाश टाकला.
तांत्रिक कापडाचा सर्वात प्रमुख वापर संरक्षक प्रकारचा आहे, ज्याचा उपयोग संरक्षक क्षेत्रातील कामगिरीसाठी केला जातो. प्रोटेक उत्पादनांची जागतिक मागणी आणि वापर पाहता तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि विशिष्ट प्रोटेक वस्तूंमध्ये गुणवत्ता मानकांच्या अंमलबजावणीवर भर दिला पाहिजे असे त्या म्हणाल्या.
S.Patil/P.Jambhekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1876613)
Visitor Counter : 230