सांस्कृतिक मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

अर्जुन राम मेघवाल यांनी आज दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्र येथे "वॅक्सीन्स इंजेक्टिंग होप" आंतरराष्ट्रीय फिरत्या प्रदर्शनाचे केले उद्घाटन


हे प्रदर्शन कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर आधुनिक काळातील लसींच्या विकासाशी संबंधित जागतिक प्रयत्नांची कथा सांगते

Posted On: 15 NOV 2022 10:06PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 नोव्‍हेंबर 2022 

 

भारतातील ब्रिटिश उच्चायुक्त अ‍ॅलेक्स एलिस यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय विज्ञान केंद्र, दिल्ली येथे सांस्कृतिक आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते “वॅक्सीन इनजेक्टिंग होप” या आंतरराष्ट्रीय फिरत्या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. ब्रिटीश कौन्सिलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  स्कॉट मॅकडोनाल्ड, सायन्स म्युझियम ग्रुपचे कार्यकारी संचालक सर इयान ब्लॅचफोर्ड,  एनसीएसएमचे  महासंचालक ए. डी. चौधरी, संस्कृती मंत्रालय सहसचिव (संग्रहालये)  मुग्धा सिन्हा, आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ, संशोधक आणि अतिथी यावेळी उपस्थित होते.

वेलकम, यूके, आयसीएमआर भारत आणि भारतातील इतर संशोधन आणि वैज्ञानिक संस्था यांच्या सहकार्याने हे प्रदर्शन आयोजित केले  आहे.  लस विकसित करण्याच्या जागतिक प्रयत्नांची कथा सांगण्यासाठी एनसीएसएम आणि सायन्स म्युझियम ग्रुप, लंडन एकत्र आले आहेत.

या प्रदर्शनात 'द अरायव्हल ऑफ न्यू व्हायरस', ''डिजाइनिंग ए न्यू वैक्सीन', 'ट्रायल, रिजल्ट्स एंड अप्रूवल्स', 'स्केलिंग अप अँड मास प्रोडक्शन', 'व्हॅक्सिन रोलआउट', 'लिव्हिंग विथ कोविड' असे विभाग आहेत आणि  महामारीच्या वेगाने लस विकसित करण्याचे नवीन मार्ग शोधण्याचा आणि ऐतिहासिक आणि समकालीन दृष्टिकोनातून लसीकरणाकडे अधिक व्यापकपणे पाहण्याच्या जागतिक प्रयत्नांची कथा यात सांगितली आहे. या प्रदर्शनात लसीची निर्मिती आणि परिणामकारकता अंतर्निहित करणारी वैज्ञानिक तत्त्वे मांडण्यात आली आहेत , त्याचबरोबर  त्यांचा वेगवान विकास, उत्पादन, वाहतूक आणि वितरण यासह पडद्यामागील कामांचा यात समावेश केला  आहे. या प्रदर्शनात ‘थ्रू द लेन्स’ ही ब्रिटीश कौन्सिलने तयार  केलेली आणि दिल्लीतील भारतीय शिल्पकार सुशांक कुमार आणि लंडनमधील नाटककार निगेल टाऊनसेंड यांच्या सहकार्याने तयार केलेली कलाकृती दाखवली आहे.  ही कलाकृती ऐतिहासिकदृष्ट्या आणि अलीकडील कोविड-19 महामारीच्या अनुषंगाने  लसीकरणाशी असलेले आपले नाते शोधण्याचा प्रयत्न करते.

15 नोव्हेंबर 2022 पासून सुरू झालेले हे  प्रदर्शन सप्टेंबर 2025 पर्यंत दिल्ली, नागपूर, मुंबई, बेंगळुरू आणि कोलकाता या भारतभरातील पाच ठिकाणी प्रवास करेल आणि 20 लाखांहून अधिक लोकांपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा आहे.

एनसीएसएम आणि सायन्स म्युझियम ग्रुप, लंडन यांनी तयार केलेले हे प्रदर्शन, आधुनिक काळातील लसीच्या निर्मितीची कथा आणि त्याच्या मानवी बाजूसह विविध पैलूबाबत माहिती देते.

 

* * *

S.Patil/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1876279) Visitor Counter : 195


Read this release in: English , Urdu , Hindi , Punjabi