रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

नितीन गडकरी यांच्या हस्ते बिहारमधील रोहतास येथे, सोन नदीवरील पांडुकाजवळ 1.5 किमी लांबीच्या दुपदरी उन्नत पुलाचे उद्घाटन

Posted On: 14 NOV 2022 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 14 नोव्‍हेंबर 2022 

 

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री  नितीन गडकरी यांच्या हस्ते आज  बिहारमधील रोहतास येथे सोन नदीवरील पांडुका जवळ २१० कोटी रुपये खर्चाच्या १.५ किमी लांबीच्या दुपदरी  उन्नत R.C.C. पुलाची पायाभरणी करण्यात आली. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, बिहार भाजप अध्यक्ष संजय जयस्वाल, खासदार छेदी पासवान, विष्णू दयाल राम, बिहार सरकारचे मंत्री आणि आमदार, खासदार आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत  आज या पुलाच्या बांधकामाची पायाभरणी करण्यात आली.

या पुलाच्या निर्मितीमुळे राष्ट्रीय महामार्ग NH-19 आणि  NH-39 थेट जोडले जातील, ज्यायोगे बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड दरम्यान वाहतूक सुलभ होईल, असे गडकरी यांनी सांगितले. सध्या रोहतास जिल्ह्यातील पांडुका येथून आणि झारखंडमधील गढवा जिल्ह्यातून श्रीनगरला जाण्यासाठी 150 किमी अंतर कापावे लागते, मात्र या पुलाच्या निर्मितीमुळे  प्रवासातील चार तासांच्या वेळेची बचत होईल, याशिवाय देहरी पुलावरील वाहतुकीचा ताणही कमी होऊन औरंगाबाद, सासाराम या शहरांची वाहतूक कोंडीच्या  समस्येतून सुटका होईल, असेही त्यांनी सांगितले.

पांडुका येथील पुलाच्या निर्मितीनंतर जवळपासच्या राज्यांमधील आणि प्रदेशातील  औद्योगिक उत्पादने , कृषीमाल  आणि दुग्धजन्य उत्पादने कमी वेळात बाजारपेठेत पोहोचू शकतील. त्यामुळे वेळ आणि इंधनाचीही बचत होईल, असेही गडकरी म्हणाले.

बिहार के पण्डुका, रोहतास में सोन नदी पर 210 करोड़ रुपए की लागत वाले पुल का शिलान्यास। #PragatiKaHighway #GatiShakti pic.twitter.com/7qs0adKrvX

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) November 14, 2022

 

* * *

R.Aghor/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875862) Visitor Counter : 163


Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu