माहिती आणि प्रसारण मंत्रालय

तुमच्या पुढे सादर करत आहोत, ‘75  क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचे विजेते

Posted On: 13 NOV 2022 11:13PM by PIB Mumbai

 

#IFFIWood,13 नोव्हेंबर 2022

सरकारच्या ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोअर्थात उद्याचे 75 सर्जनशील कलावंत या उपक्रमाचा एक भाग म्हणून, 18 ते 35 वयोगटातील 75 युवक , भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी 53 या महोत्सवात विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.  स्क्रीनिंग / सिलेक्शन ज्युरी आणि नंतर ग्रँड ज्युरी यांनी निवडलेल्या 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारोची बहुप्रतिक्षित यादी आता प्रसिद्ध झाली आहे.

उद्याचे हे उज्जवल चित्रपट विषयक प्रतिभावंत, आंध्र प्रदेश, आसाम, दिल्ली, गोवा, हरयाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, बिहार, हिमाचल प्रदेश, जम्मू - काश्मीर, ओदिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, झारखंड आणि पश्चिम बंगाल, या भारतातील 19 विविध राज्यांमधील आहेत.   निवड झालेल्या विजेत्यांमध्ये सर्वाधिक विजेते महाराष्ट्रातील असून त्यापाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालचा क्रमांक लागतो.  चित्रपट क्षेत्र आणि राज्यानुसार विजेत्यांची यादी इथे मिळू शकते.  here.

दिग्दर्शन, अभिनय, सिनेमॅटोग्राफी, संकलन, पटकथा लेखन, पार्श्वगायन, संगीत रचना, वेशभूषा आणि रंगभूषा, आर्ट डिझाईन आणि अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स (VFX),ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर) आणि व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर), या चित्रपट निर्मितीच्या विविध क्षेत्रात असलेल्या त्यांच्या प्रभुत्वाच्या आधारावर या 75 तरुणांची निवड करण्यात आली आहे. 15 कलाकार दिग्दर्शन श्रेणीतील, 13 नवोदित कलाकार, तर 11 कलाकार एडिटिंग क्षेत्रातील आहेत.

हरयाणातील 18 वर्षीय नितीश वर्मा आणि महाराष्ट्रातील 18 वर्षीय तौफिक मंडल हे सर्वात तरुण विजेते आहेत. या दोघांची संगीत रचनेतील  त्यांच्या गुणवत्तेसाठी निवड झाली आहे.  सर्वाधिक विजेते महाराष्ट्रातून (23 कलाकार), त्यानंतर तामिळनाडू (9 विजेते) आणि दिल्लीतून(6 क्रिएटिव्ह माइंड्स) आहेत.

 

75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो च्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये चार नवीन श्रेणी समाविष्ट आहेत.

या विविध क्षेत्रांपैकी, नैपुण्याची चार क्षेत्रे निवडली गेली आहेत आणि 75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो उपक्रमाच्या या आवृत्तीत त्यांचा समावेश केला गेला आहे.  या चार नवीन श्रेणी आहेत i) संगीत रचना, ii) वेशभूषा आणि रंगभूषा iii) कला रचना (आर्ट डिझाईन) आणि iv) अॅनिमेशन / VFX / AR / VR.  अपारंपरिक कौशल्ये आणि नैपुण्य यांना प्रोत्साहन देण्यासाठी, तसेच अधिकाधिक गुणवंतांना या क्षेत्रांमध्ये व्यावसायिक कारकिर्दीच्या (करिअरच्या) संधी शोधता येण्यासाठी, या क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे.

या  75 विजेत्यांना ईफ्फीच्या सोहळ्यात सामील होण्याची आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्गजांच्या मार्गदर्शनाखाली होणारी सत्रे आणि कार्यशाळेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.या बरोबरच, दक्षिण आशियाई आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट समुदायांमधील सहकार्याला प्रोत्साहन देणार्‍या, फिल्‍म बझार या मंचावर होणारी चित्रपट विषयक व्‍यवसाय प्रक्रिया जवळून बघण्याची, अनुभवण्याची संधीही त्यांना मिळणार आहे.  या तरुण गुणवंतांना मोफत येऊन जाऊन प्रवास, निवास, स्थानिक वाहतूक आणि वैभवशाली अशा इफ्फी-53 महोत्सवात प्रवेशाची मुभा देण्यात येत आहे.

 

75 नवोदित कलाकार, भारत @ 100 या संकल्पनेवर आधारीत लघुपट तयार करतील

आपला इफ्फीचा अनुभव अधिक आकर्षक आणि उत्कंठावर्धक करण्यासाठी, या 75 गुणवंतांची प्रत्येकी 15 च्या गटांमध्ये विभागणी केली जाईल आणि हे गट 53-तासांचे आव्हान या स्पर्धेमध्ये भाग घेतील. या स्पर्धेत त्यांना 53 तासांत, भारत@100 या संकल्पनेवर आधारित लघुपट तयार करायचे आहेत. शॉर्ट्स टीव्हीच्या सहकार्याने, राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने (NFDC) ही स्पर्धा आयोजित केली आहे.

 

'75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' हा उपक्रम, केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार आणि क्रीडा व्यवहार मंत्री, अनुराग सिंह ठाकूर यांच्या कल्पनेतून पुढे आला आहे.  संपूर्ण देशभरातील, चित्रपट निर्मितीशी संबंधित तरुण सर्जनशील प्रतिभावंतांना हुडकून काढणे, त्यांना प्रोत्साहन देणे आणि त्यांच्यातील गुणवत्ता जोपासणे, हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

 

75 क्रिएटिव्ह माइंड्सच्या दुसऱ्या भागासाठी जवळपास 1,000 प्रवेशिका: माहिती आणि प्रसारण  मंत्री

75 क्रिएटिव्ह माइंड्सच्या दुसऱ्या भागासाठी आपले विचार सामायिक करताना माहिती आणि प्रसारण  मंत्री म्हणाले:गोव्यातील भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात "75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो" ही संकल्पना विशेष करून युवा, कलाकार आणि  चित्रपट उद्योगातील सर्जनशील  व्यक्तींना विशेषतः सुदूर भागातून येणाऱ्यांना संधींचे अनोखे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी, शिकण्यासाठी  आणि भारतीय चित्रपट उद्योगातील लोकांशी, गोव्यातल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात त्यांची गाठ व्हावी यासाठी , आयोजित करण्यात आली आहे." 75 क्रिएटिव्ह माइंड्सच्या दुसऱ्या भागासाठी,संपूर्ण भारतातून जवळपास1,000 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत,ज्यात आसाममधील लखीमपूर आणि सोनितपूर, ओदिशातील खोरडा, आंध्रप्रदेशातील कृष्णा आणि प्रकाशम, तामिळनाडू मधील थेनी आणि महाराष्ट्रातील भंडारा सारख्या अनेक ठिकाणांचा समावेश आहे. या प्रवेशिकांमधून 75 क्रिएटिव्ह माइंड्सना मार्गदर्शन करण्यासाठी निवडले गेले आहे.मी या सर्वांचे अभिनंदन करतो आणि त्या सर्वांना त्रेपन्नाव्या इफ्फीमध्ये. भेटण्यास उत्सुक आहे."

 

75 विजेत्यांची अंतिम निवड  ही निवड ज्युरींद्वारे स्क्रीनिंग करून नंतर ग्रँड ज्युरींमार्फत अंतिम निवड अशा प्रकारच्या   निवड प्रक्रियेद्वारे करण्यात आली आहे.

 

ग्रँड ज्युरीमध्ये पुढील नावांचा समावेश आहे:

प्रसून जोशी

रसुल पुकुट्टी

आर बाल्की

रिकी केज

माला डे बांठिया

गौतमी तडीमल्ला

बल्लू सलुजा

मुंजाल श्रॉफ

नरेंद्र राहुरीकर

रवि के चंद्रन

 

निवड /स्क्रीनिंग ज्युरीचे सदस्य पुढीलप्रमाणे आहेत:

निखिल महाजन

उज्वल आनंद

बिशाख ज्योती

मालविका

प्रणिता सुभाष

एमी बरुआ

ध्वनी देसाई

दीपक सिंग

कार्तिक पलानी

सुजीत सावंत

 

चित्रपट कलेच्या आपापल्या नैपुण्य क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपडणारे भारतातील सर्जनशील प्रतिभावंत, नवनिर्मितीसाठी सज्ज: प्रसून जोशी

"भारतातील विविधता हे आपले मोठे सामर्थ्य आहे आणि जेव्हा आपण काही मोजक्या बड्या शहरांच्या पलिकडे जाऊन, भारतातील प्रत्येक भागातून येणाऱ्या त्यांच्या कहाण्या ऐकू तेव्हाच आपण भारतातील या विविधतेला  खरा न्याय देऊ शकू असा मला विश्वास आहे.  75 क्रिएटिव्ह माइंड्स उपक्रम राबवण्यामागे हाच खरा विचार आहे", असे या उपक्रमाविषयी बोलताना ग्रँड ज्युरी सदस्य प्रसून जोशी यांनी सांगितले.

चित्रपट कलेच्या आपापल्या नैपुण्य क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्यासाठी धडपडणारे भारतातील सर्जनशील प्रतिभावंत, नवनिर्मितीसाठी सज्ज आहेत, असेही ते म्हणाले.  "चित्रपट प्रेक्षकाच्या मनावर जादू करणारे असले पाहिजेत. केवळ योगायोगाने संधी मिळाली म्हणून नाही तर आंतरिक उर्मीतून चित्रपट बनवणारे चित्रपट निर्माते आपल्याला हवे आहेत, आणि त्यासाठी, आपण आपल्या या तरुण गुणवत्तेला योग्य संधी द्वारे जगापुढे आणले पाहिजे. माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग जी ठाकूर यांच्यासमवेत आपण गेल्या वर्षी  हा उपक्रम इफ्फीमध्ये सुरू केला होता.  अगदी परिश्रमपूर्वक या तरुण प्रतिभावंतांची निवड केल्याबद्दल, मान्यवर ज्युरी सदस्यांचे मी मनापासून आभार मानतो", असेही प्रसून जोशी यांनी सांगितले

 

"युवा कलाकारांना जगाच्या पलीकडे पाहण्याची प्रेरणा देते": रसुल पुकुट्टी

75 क्रिएटिव्ह माइंड्स हा युवा कलाकारांना प्रेरणा देण्याची ताकद असलेला आणि चित्रपटाच्या माध्यमातून जगाच्या पलीकडे पाहण्याची दृष्टी निर्माण करण्याचा तसेच त्यांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा एक अनोखा मार्ग आहे, असा विश्वास, प्रसिद्ध साउंड डिझायनर आणि ग्रँड ज्युरी सदस्य रसुल पुकुट्टी यांनी यावेळी व्यक्त केला.

"दि क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो" म्हणजे युवा कलाकारांनी  सिनेमाच्या माध्यमातून युवा मनाचा शोध घेण्याचा आणि त्यांच्या आशा आकांक्षा रुजवित जगाच्या पलीकडे पाहण्याचा एक विस्मयकारक मार्ग आहे. जग आणि सिनेमाद्वारे स्वतःचा संदेश पोहोचविण्यासाठी,समाजात चांगले परीवर्तन घडवून आणत उत्तम समाज निर्माण करण्यासाठी उपयुक्त मंच आहे.सर्वात महत्त्वाचे म्हणजे, इफ्फी 2022 ही भारतातील सुप्रसिद्ध चित्रपट महोत्सवात सहभागी होण्याची उत्तम संधी आहे.

75 क्रिएटिव्ह माइंड ऑफ टुमारो ही भारताला जागतिक आशय  आणि निर्मिती पूर्ण झाल्यानंतर त्यावर संस्कार करण्याचे केंद्र बनवण्याच्या दिशेने उचललेले एक पाऊल आहे. हा उपक्रम भारतीय चित्रपट उद्योगातील सुप्रसिद्ध व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली युवा नवोन्मेषी विचारांना ओळख मिळवून देतो, तयार करतो आणि सराव करून देतो. या उपक्रमाद्वारे युवा चित्रपटकर्मीं उद्योग संपर्क विकसित करत,सहयोग करत एकमेकांना जोडत आणि सक्षम करत, एक बहुविध वातावरण निर्माण करत  चित्रपट समुदायाला रुजविले जात आहे. 

 

आपण क्रिएटिव्ह माइंड्सच्या संपर्कात राहू इच्छिता का?

तुम्हाला या भागातील विजेत्यांशी संपर्क साधायला आवडेल का तर मग आम्हाला iffi-pib[at]nic[dot]in येथे संपर्क करा, मागच्या  आवृत्तीच्या विजेत्यांची

घोषणा इथे पाहता येईल https://pib.gov.in/PressReleaseIframePage.aspx?PRID=1773530

***

N.Chitale/A.Save/S.Patgaonkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875695) Visitor Counter : 208