कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

फेस ऑथेंटिकेशन अर्थात चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे डिजिटल जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे पथक मुंबईजवळील अंबरनाथला भेट देणार आहे

Posted On: 13 NOV 2022 3:12PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW) केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रसारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये, केंद्रीय राज्यमंत्री (पीपी) डॉ. जितेंद्र सिंह यांनी, कोणत्याही अँड्रॉइड मोबाइल फोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे अगदी महत्वाचे चेहरा प्रमाणीकरण (फेस ऑथेंटिकेशन) तंत्र सुरू केले होते. आता, निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग (DoPPW)  हे डिजिटल तंत्रज्ञान वापरून काढण्यात येणाऱ्या जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी आणि फेस ऑथेंटिकेशन तंत्र (चेहरा प्रमाणन तंत्र) लोकप्रिय करण्यासाठी एक विशेष देशव्यापी मोहीम सुरू करत आहे. सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना,  निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची मंत्रालये आणि सीजीएचएस आरोग्य केंद्रे यांना निवृत्तीवेतनधारकांच्या ‘इज ऑफ लिव्हिंग’ अर्थात जीवन सुलभीकरणासाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट/फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या श्रृंखलेत, केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे (DoPPW) पथक येत्या बुधवारी (16 नोव्हेंबर 2022) रोजी महाराष्ट्रातील अंबरनाथला भेट देणार आहे, जिथे अंबरनाथ शाखेतील केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी ही मोहीम आयोजित केली जाईल. सर्व निवृत्तीवेतनधारक डिजिटल माध्यमातून त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी केंद्राला भेट देऊ शकतात.

1 ऑक्टोबर 2022 पर्यंत एकूण 29 लाख 29,986 डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) जारी करण्यात आले होते. यापैकी एकूण 1 लाख 52 हजार 172 निवृत्तीवेतन धारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डिजिटल लाइफ सर्टिफिकेटचा पर्याय निवडला आहे. डीएलसी निवडणाऱ्या केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांची संख्या 11 लाख 95 हजार 594 आहे, त्यापैकी 96,099 केन्द्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे डीएलसीची निवड केली आहे.

यापूर्वी जीवन प्रमाणपत्र प्रत्यक्ष स्वरूपात सादर करावे लागत होते आणि त्यासाठी वृद्ध निवृत्तीवेतनधारकांना तासनतास बँकांबाहेर रांगेत उभे राहावे लागत होते. आता घरबसल्या एका बटणाच्या क्लिकवर जीवन प्रमाणपत्र सादर करणे शक्य झाले आहे. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे प्रथमच जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत, आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक आणि बँक/पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक यासंबंधीचे तपशील आवश्यक आहेत. ही सुविधा राज्य सरकारच्या कर्मचार्‍यांना आणि राज्याच्या कोषागार कार्यालयाच्या स्वरूपात वितरण प्राधिकरणासाठी देखील उपलब्ध आहे.

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DoPPW)  सर्व निवृत्तीवेतनधारकांना विभागाच्या DOPPW_INDIA OFFICIAL,  या अधिकृत  यू ट्यूब  वाहिनीला भेट देण्याची विनंती केली आहे, जिथे साध्या भाषेत चेहरा प्रमाणीकरण तंत्राद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया स्पष्ट करणारे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने  सर्व पेन्शनधारकांना त्यांचे जीवन प्रमाणपत्र डिजिटल माध्यमातून सादर करण्यासाठी केंद्राला भेट देण्याचे आवाहन केले आहे.

***

M.Jaybhaye/V.Yadav/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1875602) Visitor Counter : 160