कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारत सरकारच्या कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, मंत्रालयाच्या निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाकडून, केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या जागृतीविषयी देशव्यापी मोहीमेचा प्रारंभ

Posted On: 11 NOV 2022 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 नोव्‍हेंबर 2022

 

भारत सरकारच्या  कार्मिक , सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, मंत्रालयाच्या   निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने,  केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या जागृतीविषयी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी  अर्थात आपल्या चेहऱ्याचे प्रमाणीकरण करण्याच्या योजनेचा शुभारंभ  कार्मिक , सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन मंत्रालयाचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह, यांच्या हस्ते झाला होता.

निवृत्तीवेतनधारकांच्या सोईसाठी सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक  संघटना, निवृत्तीवेतन वितरण बँका, भारत सरकारची  मंत्रालये आणि केंद्र सरकारच्या आरोग्य विषयक  केंद्रांना   विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र देण्यासाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्र /फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या उपक्रमाचा एक भाग म्हणून  अवर सचिवांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारच्या  निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाचे एक पथक प्रयागराजमध्ये दाखल झाले होते. या अंतर्गत केंद्र सरकारच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी 11 नोव्हेंबर 2022 रोजी उत्तर प्रदेश मधील प्रयागराज,  येथील  स्टेट बँक ऑफ इंडियाच्या , बमरौली शाखा,  येथे एक मोहीम घेण्यात आली.

या मोहिमेत निवृत्तिवेतनधारकांचा मोठा उत्साह दिसून आला,  ९२ वर्षीय निवृत्तिवेतनधारक  श्री. के सी गुप्ता यांनी फेस ऑथेंटिकेशनद्वारे त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर केले, ज्यावरून निवृत्तिवेतनधारकांच्या उत्साहाचा  अंदाज  लावता येऊ शकेल. हे नवीन तंत्रज्ञान कार्यान्वित केल्याबद्दल त्यांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. या पेन्शनधारकांना त्यांच्या मोबाईल फोनमध्ये फेस ऑथेंटिकेशन जीवन प्रमाण अॅप कसे डाउनलोड करावे आणि त्यांच्या फोनवरून जीवन प्रमाणपत्र कसे द्यावे याबद्दल विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. हे जीवन प्रमाणपत्र केवळ  60 सेकंदात तयार केले जाते आणि मोबाईल फोनवर आलेल्या लिंकद्वारे ते डाउनलोड केले जाऊ शकते.

केंद्र सरकारच्या  कार्मिक , सार्वजनिक तक्रार आणि निवृत्तीवेतन, मंत्रालयाने डिजिटल जगात उचललेले हे एक महत्वाचे पाऊल आहे. याआधी जीवन प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वयोवृद्ध निवृतीवेतन धारकांना तासनतास बँकेच्या बाहेर रांग लावून ताटकळत उभे राहावे लागत असे, असे अवर सचिव  दीपक गुप्ता यांनी सांगितले. आता हीच गोष्ट घरच्या घरी एका क्लिकद्वारे सहज साध्य झाली आहे, असे ते म्हणाले. मोबाईलद्वारे फेस ऑथेंटिकेशनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेत,  आधार क्रमांक, ओटीपीसाठी मोबाइल क्रमांक, पीपीओ क्रमांक, बँक किंवा पोस्ट ऑफिसमधील खाते क्रमांक इत्यादी संबंधित तपशील केवळ सुरुवातीला एकदाच देणे आवश्यक आहे. ही सुविधा राज्य सरकारी कर्मचारी आणि राज्याचे कोषागार कार्यालय म्हणून संवितरण प्राधिकरण असलेल्यांसाठी देखील उपलब्ध आहे.

 

* * *

S.Patil/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1875335) Visitor Counter : 232
Read this release in: English , Urdu , Hindi , Telugu