कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी राष्ट्रव्यापी मोहीम

Posted On: 10 NOV 2022 6:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 नोव्‍हेंबर 2022

 

कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालयाच्या, निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्यावतीने केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्‍या प्रचारासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये केंद्रीय राज्‍यमंत्री  डॉ. जितेंद्र सिंग, यांनी कोणत्याही अँड्रॉइड मोबाईल फोनद्वारे जीवन प्रमाणपत्र सादर करण्याच्या  ‘फेस ऑथेंटिकेशन’  तंत्राचा प्रारंभ  केला  होता. आता विभागाच्यावतीने  डिजिटल माध्‍यमाद्वारे  जीवन प्रमाणपत्राचा प्रचार करण्यासाठी आणि  ‘फेस ऑथेंटिकेशन’  तंत्र लोकप्रिय करण्यासाठी एक विशेष देशव्यापी मोहीम सुरू करण्यात आली  आहे.

सर्व नोंदणीकृत निवृत्तीवेतनधारक संघटना, पेन्शन वितरण करणा-या बँका, सर्व  मंत्रालये आणि सीजीएचएस म्हणजेच केंद्र सरकारच्या आरोग्‍य योजनांची  कल्याण  केंद्रे यामधील  निवृत्तीवेतनधारकांसाठी  ‘ ईज  ऑफ लिव्हिंग’ अर्थात त्यांचे जीवनमान सुलभ करण्‍यासाठी विशेष शिबिरे आयोजित करून जीवन प्रमाणपत्र सादर करण्यासाठी डिजिटल लाइफ सर्टिफिकेट/फेस ऑथेंटिकेशन तंत्राचा प्रचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागातील विभाग अधिकारी देबोरा उमेश, विभाग अधिकारी अँड्र्यू झोमाविया कार्थक आणि सल्लागार तान्या राजपूत यांच्या नेतृत्वखालील केंद्र सरकारचे पथक दिल्ली येथल्या आर. के. पुरम मधील सेक्टर  1 शाखेला भेट देऊन  11नोव्हेंबर , 2022 रोजी भेट देणार आहेत. 

 

* * *

S.Kakade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1874999) Visitor Counter : 159