वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
परदेशी व्यापार धोरणाअंतर्गत, निर्यात प्रोत्साहन योजनांसाठी आंतरराष्ट्रीय व्यापाराचे व्यवहार भारतीय रुपयात करायला केंद्र सरकारची मंजुरी
या निर्णयामुळे, आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारात सुलभता आणि भारतीय चलनात व्यवहार करण्याची सुविधा उपलब्ध होणार
Posted On:
09 NOV 2022 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 नोव्हेंबर 2022
भारत सरकारने आपल्या परदेशी व्यापार धोरण तसेच, या व्यापारी प्रक्रियेच्या नियमपुस्तिकेत सुधारणा केली असून, त्यानुसार, आंतरराष्ट्रीय व्यापारी व्यवहार आता भारतीय चलनात( रुपयात) करण्यास परवानगी देण्यात आली आहे. म्हणजेच बील (इनव्हॉईस), पेमेंट आणि निर्यात/आयातीचे पैसे आता भारतीय रुपयात देणे शक्य होणार आहे. यासंदर्भात, परदेशी व्यवहार महासंचालनालयाने (DGFT) अधिसूचना क्रमांक 33/2015-20, दिनांक 16 सप्टेंबर 2022 नुसार, या हँडबुक मध्ये, परिच्छेद 2.52(d) समाविष्ट करण्यात आला आहे. त्यानुसार, इनव्हॉईस तयार करणे, पेमेंट आणि आयात निर्यातीचे पैसे भारतीय चलनात देणे शक्य होणार आहे. रिजर्व बँकेच्या, 11 जुलै 2022च्या परिपत्रक क्रमांक 10 च्या अनुसार, ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
या अधिसूचनेत सातत्य ठेवत, परदेशी व्यापार धोरणाच्या परिच्छेद 2.53 अंतर्गत, परदेशी व्यापार धोरणांतर्गत निर्यात लाभ / प्रोत्साहने / निर्यात बंधनाच्या पूर्ततेसाठी, भारतीय रुपयामध्ये निर्यात वसुलीसाठी, आरबीआयच्या 11 जुलै 2022 रोजीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार बदल करण्यात आले आहेत.
या अद्ययावत तरतुदींनुसार, भारतीय रुपयात निर्यात करण्यासाठी, निर्यातीसाठी आयात (परिच्छेद 2.46 एफटीपी), निर्यात कामगिरीत, स्टेटस होल्डर्स (FTP चा परिच्छेद 3.20), अॅडव्हान्स ऑथोरायझेशन (AA) आणि ड्यूटी फ्री इंपोर्ट ऑथोरायझेशन (DFIA) योजना (FTP चा परिच्छेद 4.21) अंतर्गत निर्यात प्रक्रियांची पूर्तता आणि निर्यात प्रोत्साहन भांडवली वस्तू योजना ( EPCG) (HBP चा परिच्छेद 5.11).
त्यानुसार, 11 जुलै 2022 च्या रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार परदेशी व्यापार धोरणांतर्गत निर्यात दायित्वाचे फायदे / प्रोत्साहन / पूर्तता यांची भारतीय रुपयामध्ये वसुलीसाठीची बंधने वाढविण्यात आली आहे. भारतीय रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात वाढलेले स्वारस्य लक्षात घेऊन, त्यानुसार या धोरणात सुधारणा करण्यात आल्या आहेत. भारतीय रुपयात आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहार सुलभ करण्यासाठी आणि सुलभ करण्यासाठी हाती घेतले आहे.
S.Patil/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874814)
Visitor Counter : 396