गृह मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गुरुपूरब साजरे करण्याला विशेष महत्त्व दिले आहे आणि त्याच भावनेने केंद्रीय गृह मंत्रालयाने यात्रेकरूंचा प्रवास सुरळीत आणि आरामदायी होण्यासाठी सर्व व्यवस्था केल्या आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निर्देशानुसार, गृह मंत्रालयाने गुरुपूरब निमित्त भारतीय शीख यात्रेकरूंना ननकाना साहिबला भेट देण्यासाठी सुविधा पुरवली
Posted On:
08 NOV 2022 10:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच गुरुपूरब साजरे करण्याला विशेष महत्त्व दिले आहे आणि त्याच भावनेने केंद्रीय गृह मंत्रालयाने यात्रेकरूंसाठी सुरळीत आणि आरामदायी प्रवासासाठी सर्व व्यवस्था केली.
एसजीपीसी ,डीएसजीएमसी अंतर्गत एकूण 2,420 भारतीय शीख यात्रेकरू गुरू नानक जयंती सोहळा 2022 मध्ये सहभागी होण्यासाठी 6 नोव्हेंबर 2022 रोजी अटारी रोडने पाकिस्तानला रवाना झाले.
यात्रेकरूंना ननकाना साहिब, सच्चा सौदा इत्यादींसाठी 10 दिवसांचा पाकिस्तानी यात्रेकरू व्हिसा (06-15 नोव्हेंबर 2022 पर्यंत) जारी करण्यात आला आणि त्यांनी प्रामुख्याने एसजीपीसी ,डीएसजीएमसी , हरियाणा यात्री शीख जत्था , सुखमणी साहेब सेवा सोसायटी हरियाणा यासह विविध शीख धार्मिक संघटनांच्या बॅनरखाली प्रवास केला. यात्रेकरू 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत परतणार आहेत.
त्याचप्रमाणे, गुरुपुरबनिमित्त प्रार्थना करण्यासाठी भारतातील एकूण 433 यात्रेकरूंनी आज आयसीपी डेरा बाबा नानक, अमृतसर द्वारे पाकिस्तानमधील श्री करतारपूर साहिब गुरुद्वाराला भेट दिली.
प्रार्थना करून सर्व यात्रेकरू परत आले आहेत.
* * *
N.Chitale/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874588)
Visitor Counter : 214