कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
युवा भारतीयांनी जागतिक पातळीवर उदयाला येत असलेल्या कौशल्यविषयक गरजांनुसार कौशल्ये आत्मसात केलीच पाहिजेत- केंद्रीय राज्यमंत्री चंद्रशेखर
Posted On:
07 NOV 2022 10:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 नोव्हेंबर 2022
युवा भारतीयांनी स्वतःला रोजगारक्षम बनवण्यासाठी आणि उद्योजकतेच्या संधींसाठी सक्षम बनण्यासाठी सध्याच्या काळात उदयाला येत असलेल्या कौशल्यविषयक गरजांनुसार स्वतःला कौशल्यांनी परिपूर्ण बनवले पाहिजे, असे मत केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी व्यक्त केले आहे.
कौशल्ये म्हणजे समृद्धी आणि संधींचे पासपोर्ट आहेत, असे ते म्हणाले. शिक्षणाबरोबरच भविष्याला अनुरूप अशी कौशल्ये असणे गरजेचे आहे जेणेकरून रोजगाराच्या बाजारपेठेत किंवा उद्योजकतेच्या क्षेत्रांमध्ये स्वतःला स्पर्धात्मक राखणे सुकर होईल, असे त्यांनी सांगितले. रामबन जिल्ह्यातील सरकारी तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाला ते संबोधित करत होते.
प्रत्येकाला भारताच्या अगदी दुर्गम भागातल्या युवकांना कौशल्याच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन आहे . त्यामुळेच आज सरकारकडून विद्यार्थी/ तरुण उद्योजक यांच्यासाठी अल्प आणि दीर्घकालीन असे दोन्ही प्रकारचे 5000 कौशल्य कार्यक्रम उपलब्ध करण्यात आले आहेत, अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली. झपाट्याने बदलत जाणाऱ्या तंत्रज्ञानविषयक वातावरणात आगामी काळात कौशल्याच्या मागणीतही बदल होणार असल्याचे लक्षात घेऊन याविषयीच्या अभ्यासक्रमात बदल करून नवीन भविष्यानुकूल अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. या तंत्रनिकेतन महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचारीवर्गाने आयोजित केलेल्या एका कौशल्य प्रदर्शनाला देखील त्यांनी भेट दिली आणि तंत्रज्ञान, स्वयंचलित उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पादनांपासून ते राज्यातील पारंपरिक कला/ वस्तू यांची नावीन्यपूर्ण पद्धतीने केलेली मांडणी पाहून ते प्रभावित झाले.
त्यानंतर राजीव चंद्रशेखर यांनी रामबन येथे एका रोजगार मेळ्याचे उद्घाटन केले ज्यामध्ये त्यांनी रोजगार प्राप्त करणारे आणि रोजगारदाते या दोघांशीही संवाद साधला.
N.Chitale/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874373)
Visitor Counter : 198