कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
कामाख्यानगर कौशल महोत्सवामधून ओडिशातील तरुणांना एका दिवसात नोकरीच्या 1200 संधी
Posted On:
06 NOV 2022 9:50PM by PIB Mumbai
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आपल्या धोरणात्मक अंमलबजावणीतून आणि ज्ञान भागीदार असलेल्या, राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ यांनी ओडीशातल्या सारंगधर स्टेडियम,कामाख्यानगर स्टेडियम ढेंकनाल येथे आज आयोजित केलेल्या कौशल्य महोत्सवाला तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि दिवसभरात हजारोच्या संख्येने नोंदणी झाली. आपल्या तरुणांची कौशल्ये आणि संधी यांची सांगड घालण्यावर आणि भारताला जगातील कौशल्य केंद्र बनविण्यावर भर देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांच्या आवाहनाला अनुसरून याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात 20 पेक्षा अधिक विविध क्षेत्रातील 70 हून अधिक कंपन्यांनी ओडिशातील तरुणांसाठी अप्रेंटिसशिप (शिकाऊ उमेदवारी) आणि नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध केल्या.
या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते झाले.
ही एक अशा कार्यक्रमाची मालिका असेल जी राज्यामध्ये वेळोवेळी आयोजित केली जाईल, ज्यामधून ओडिशातील स्थानिक तरुणांना आणि समुदायांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील.
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1874165)
Visitor Counter : 161