माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

#इफ्फी कधी सुरु होणार?

 

इफ्फी ?कधी ? तुम्ही आमच्यासारखे उत्सुक नसल्यास, तुम्ही विचाराल की हे इफ्फी नेमके काय आहे? तुम्हाला हा प्रश्न पडत असेल तर प्रिय वाचकांनो, तुम्हाला कळवण्यास अत्यानंद होत आहे की इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव.

 

#इफ्फी कधी आहे? सर्वात महत्त्वाचे, #इफ्फी का?

1952 मध्ये सुरु झालेला इफ्फी हा आशियातील सर्वात महत्त्वाचा चित्रपट महोत्सव आहे. दरवर्षी आयोजित होणारा हा महोत्सव सध्या गोवा या पर्यटन राज्यामध्ये होतो. चित्रपट, त्यातील कथा आणि त्यामागील लोकांच्या कलाकृतींना मानवंदना देणे, ही भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची संकल्पना आहे.  याद्वारे, चित्रपटांबद्दल उत्कट प्रेम, त्याबद्दलचे मनापासून कौतुक अगदी व्यापक आणि खोलवर वाढवण्याचा, प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न आम्ही करतोलोकांमध्ये प्रेम, समंजसपणा आणि बंधुभावाचे पूल बांधण्यासाठीतसेच वैयक्तिक आणि सामूहिक उत्कृष्टतेची नवीन शिखरे गाठण्यासाठी त्यांना प्रेरणा देणे हा उद्देश आहे.

जगभरातील चित्रपटसृष्टीला एक समान व्यासपीठ उपलब्ध करून देऊन, त्यांना चित्रपट कलेतील सर्वोत्तम सादर करण्यास सक्षम करून हा महोत्सव संबंधित उद्दिष्टांचा पाठपुरावा करतोअशा प्रकारे विविध राष्ट्रांच्या चित्रपट संस्कृतींना त्यांच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मूल्ये समजून घेण्यास आणि त्यांचे कौतुक करण्यास हातभार लावतो; तसेच त्याद्वारे जगातील लोकांमध्ये मैत्री आणि सहकार्य वाढवतो.

आणि हो, हा उत्सव सरकारद्वारे आयोजित केला जातो याची नोंद घेणे महत्त्वाचे आहे.  केन्द्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे दरवर्षी एंटरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा, यजमान राज्य अर्थात गोवा सरकार यांच्या सहकार्याने हे आयोजन केले जाते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतील चित्रपट महोत्सव संचालनालय (डीएफएफ) सामान्यत: महोत्सवाची धुरा सांभाळते, मात्र राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळात (एनएफडीसी) चित्रपट माध्यम विभागाचे विलीनीकरण झाल्यामुळे, एनएफडीसीने महोत्सवाचे आयोजन केले आहे. 

2004 मध्ये प्रथमच गोव्यात आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला किनारपट्टीवरील या राज्यात चांगला प्रतिसाद मिळत असून, दर वर्षी हा महोत्सव इथे आयोजित करणात येतो. आणि 2014 मध्ये इफ्फीच्या (IFFI) आयोजनासाठी गोवा हेच कायम स्वरूपी ठिकाण म्हणून घोषित करण्यात आले.

 

#इफ्फी कधी?

ठीक आहे, ठीक आहे; आपण जिथे सुरुवात केली होती तिथे परत येऊया; तर, तुम्हाला इफ्फी बद्दल आधीच माहिती होती, किंवा निदान आता तुम्हाला याबद्दल समजले असेल . तर, तुम्ही म्हणाल, काय हे, आम्ही या महोत्सवाचे आयोजकच मूलभूत असा हा प्रश्न का विचारत आहोत? खरे आहे ,दरवर्षी 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान इफ्फी आयोजित केला जातो. आम्हाला हे माहीत नाही का? हे सर्वांना माहीत नाही का? मग हा प्रश्न का,आणि  तो ही महोत्सवाच्या आयोजकांकडून?

तर, प्रिय चित्रपट प्रेमी, चित्रपट रसिक, कलेचे जाणकार आणि जीवनाचा आनंद साजरा करणाऱ्यांनो, सर्वात मूलभूत प्रश्न हे अधिक उत्सुकता वाढवणारे आणि त्याबरोबरच महत्वाचे नसतात काएवढंच नाही, तर विशेषतः कलेचा एवढा मोठा उत्सव आयोजित करण्याची जबाबदारी सोपवलेले लोकसेवक म्हणून, आमचा विश्वास आहे की केवळ योग्य उत्तरे मिळणं महत्वाचं नसतं; तर चांगली आणि अधिक चांगली उत्तरं मिळणे अधिक उपयुक्त ठरेल, याच्याशी तुम्ही सहमत व्हाल. योग्य उत्तर सापडेल, हा विश्वास, आपल्याला ते आणखी शोधण्यापासून परावृत्त करेल, जे अधिक चांगल्या, कदाचित अधिक बरोबर, उत्तरं आणि अधिक चांगल्या प्रश्नांच्या मार्गात अडथळा ठरू शकेल, तुम्हाला काय वाटतं?

चला तुमच्याकडून ऐकूया ! सर्वोत्तम उत्तराला मिळेल  मुंबई-गोवा-मुंबई क्रूझ सफर …आम्ही जो प्रश्न विचारत आहोत  #WhenIsIFFI? त्यावरील सार्वजनिक प्रतिसादांचे आम्ही स्वागत करू. तुम्ही तुमची उत्तरे आम्हाला iffi-pib[at]nic[dot]in  या संकेतस्थळावर पाठवू शकता तसेच उत्तरे ट्विट करून शेअर करू शकता. (#WhenIsIFFI ) हा हॅशटॅग वापरण्याचे लक्षात ठेवा, जेणेकरून आम्हाला तुमचे उत्तर मिळेल).

आम्ही तुम्हाला जे सांगितले आहे ते लक्षात ठेवा, आम्ही फक्त योग्य उत्तरे नव्हे तर चांगली आणि अधिक चांगली उत्तरे शोधत आहोत. आम्ही ईमेलद्वारे आणि ट्विटरवर मिळालेली उत्तरे पाहू आणि सर्वोत्तम एक उत्तर निवडू; आणि ज्या व्यक्तीने हे उत्तर पाठवले त्याला आमच्याकडून एक आकर्षक बक्षीस मिळेल. तसेच , जर तुम्ही इफ्फी मध्ये सहभागी होण्यासाठी गोव्यात येत असालतर तुम्ही आमच्याकडून व्यक्तिशः  हे पारितोषिक मिळवू शकता.

आणि हो, अनेक ऑफर्सप्रमाणे ही मर्यादित कालावधीची ऑफर आहे, 13 नोव्हेंबर 2022 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 11.59.59 पर्यंत या ऑफरची मुदत आहे.

आणि हो, तुम्ही पाठवलेल्या सर्वोत्तम उत्तरांसह, आम्ही तुम्हाला हा सर्वात मूलभूत प्रश्न विचारण्यास कशामुळे प्रेरित झालो: #WhenIsIFFI? याचे उत्तरही देऊ.

[गोव्यातील ५३व्या इफ्फीचे सर्व संबंधित अपडेट्स फेस्टिव्हलच्या www.iffigoa.org  वेबसाइटवर, PIB वेबसाइटवर (pib.gov.in), ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरील इफ्फीचे सोशल मीडिया अकाउंट्स आणि पीआयबीच्या सोशल मीडिया हँडलवरही मिळू शकतात.]

या चित्रपट महोत्सवाचा भरपूर आनंद ल़ुटुया आणि आनंद शेअरही करूया.

***

S.Kane/V.Ghode/R.Agashe/P.Jambhekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1873966) Visitor Counter : 286