संरक्षण मंत्रालय
नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार जपान दौऱ्यावर
Posted On:
05 NOV 2022 10:42AM by PIB Mumbai
नौदल प्रमुख (सीएनएस) अॅडमिरल आर हरी कुमार 05 ते 09 नोव्हेंबर 22 या कालावधीत जपानच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. योकोसुका येथे 06 नोव्हेंबर 22 रोजी जपान सागरी स्वसंरक्षण दल स्थापनेच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त, दलाद्वारे (जेएमएसडीएफ) आयोजित आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू (आयएफआर) प्रसंगी ते उपस्थित राहतील.
या भेटीदरम्यान, पश्चिम प्रशांत सागरी परिषदेतील (डब्लूपीएनएस) निरीक्षक नौदलांपैकी एक म्हणून, 07-08 नोव्हेंबर 22 रोजी योकोहामा येथे 18 व्या डब्लूपीएनएसमध्ये, नौदल प्रमुख सहभागी होतील. जपानने, डब्लूपीएनएसचे वर्तमान अध्यक्ष म्हणून, याचे आयोजन केले आहे.
आयएफआर आणि डब्लूपीएनएस दरम्यान भारत आणि भारतीय नौदलाचे प्रतिनिधीत्व करण्यासोबतच, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या सहभागाने योकोसुका येथे आयोजित केल्या जाणाऱ्या मलाबार 2022 युद्धसरावाच्या उद्घाटनासाठी देखील ते उपस्थित राहणार आहेत. मलाबार सरावाची सुरुवात 1992 झाली असून या वर्षी तिचे 30 वे वर्धापन वर्ष आहे.
अॅडमिरल हरी कुमार हे आयएफआर, डब्लूपीएनएस आणि मलाबारमध्ये सहभागी असलेल्या जवळपास 30 देशांतील त्यांच्या समकक्षांशी आणि इतर शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी देखील संवाद साधणार आहेत.
भारतीय नौदलाची शिवालिक आणि कामोर्टा ही जहाजे देखील 02 नोव्हेंबर 22 रोजी जपानच्या योकोसुका येथे आयएफआर आणि मलाबार – 2022 सरावात सहभागी होण्यासाठी पोहोचली आहेत. या बहु-राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये भारतीय नौदलाच्या स्वदेशी बनावटीच्या जहाजांची उपस्थिती, मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय जहाज बांधणीची क्षमता दाखवण्याची संधी असेल.
नौदल प्रमुखांचा जपान दौरा हा जपानसोबतच्या उच्चस्तरीय द्विपक्षीय संरक्षण गुंतवणूक तसेच बहुपक्षीय सहभागामध्ये भारताचा सक्रिय पाठिंबा आणि सहभाग यांचे निदर्शक आहे.
****
S.Tupe/Vinayak/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873905)
Visitor Counter : 213