युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय
निर्धारित वेळेत ठावठिकाणा सादर न केलेल्या खेळाडूंना नाडा इंडियाने बजावली नोटीस
Posted On:
04 NOV 2022 9:27PM by PIB Mumbai
निर्धारित वेळेत ठावठिकाणा दाखल न केलेल्या खेळाडूंना नाडा इंडियाने नोटीस बजावली आहे. नाडा उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी नियम - अनुच्छेद 5.5 नुसार, नोंदणीकृत चाचणी पूलचा (आरटीपी) भाग असलेल्या काही खेळाडूंनी ऑनलाइन पोर्टल/अॅपमध्ये आपल्या ठावठिकाणा विषयी अनिवार्य माहिती पुरवणे अनिवार्य आहे. ही माहिती स्पर्धेव्यतिरिक्त उत्तेजक द्रव्य सेवन नियंत्रणाच्या दृष्टीने खेळाडूंचा ठावठिकाणा शोधण्यासाठी वापरली जाते.
आरटीपीचा भाग असलेल्या खेळाडूंना त्रैमासिक आधारावर त्यांच्या ठावठिकाण्यासंदर्भात माहिती प्रदान करणे आवश्यक आहे ज्यामध्ये घराचा पत्ता, ईमेल पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक, रात्री निवास करत असलेला पत्ता, स्पर्धेचे वेळापत्रक आणि ठिकाणे तसेच संभाव्य 'चुकलेल्या चाचणीसाठी' जबाबदार धरले जात असल्यामुळे चाचणीसाठी उपलब्ध आणि प्रवेशयोग्य असण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी 60-मिनिटांच्या वेळेचा स्लॉट भरणे या गोष्टींचा यात समावेश आहे,
12 महिन्याच्या कालावधीत ठावठिकाणा (दाखल करण्यात अपयश आणि/किंवा चुकलेल्या चाचण्या) दाखल करण्यात तीन वेळा अयशस्वी होण्याचे कोणतेही कारण नाडा उत्तेजक द्रव्यसेवन विरोधी नियम - अनुच्छेद 2.4 अंतर्गत उत्तेजक द्रव्य सेवन विरोधी नियमांचे उल्लंघन आहे. यामुळे 4 वर्षांपर्यंत प्रतिबंध लागू होऊ शकतो.
नाडाने सर्व खेळाडूंना 14 दिवसांच्या आत त्यांचा ठावठिकाणा दाखल करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी ही माहिती न भरल्यास ते दाखल करण्यात अयशस्वी ठरले असे मानले जाईल.
‘ठावठिकाणा दाखल करण्यातले अपयश’ टाळण्यासाठी खेळाडूंनी अचूक पत्ता वेळेवर सादर करणे सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय क्रीडा महासंघांनाही सूचना देण्यात आल्या आहेत
नुकतेच, ‘ठावठिकाणा दाखल करण्यात अपयशी’ आढळल्यामुळे एका खेळाडूला उत्तेजक द्रव्यविरोधी शिस्तपालन समितीने क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी एक वर्षासाठी निलंबित केले होते.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1873834)
Visitor Counter : 172