नौवहन मंत्रालय
हिंद महासागर क्षेत्रातील नील अर्थव्यवस्थेच्या संधी खुल्या करण्यासाठी भारतीय सागरी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सर्बानंद सोनोवाल यांनी विविध अभिनव कल्पना मांडल्या
Posted On:
04 NOV 2022 7:46PM by PIB Mumbai
केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग आणि आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज तामिळनाडूत चेन्नई येथे भारतीय सागरी विद्यापीठाच्या 7 व्या दीक्षांत समारंभात विविध अभिनव कल्पना मांडल्या. केंद्रीय मंत्र्यांच्या हस्ते भारतीय सागरी विद्यापीठाच्या सागरी अभ्यासक्रमाच्या धोरण संशोधन केंद्राचे (C-PRIMeS) उद्घाटनही यावेळी करण्यात आले.
सागरी अभ्यासासाठीचे धोरण संशोधन केंद्र सागरी क्षेत्रासंदर्भात अभ्यास करेल आणि सागरी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी तज्ज्ञांच्या विचार गटाच्या रूपात काम करेल. सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाच्या दृष्टीकोनाला पूरक म्हणून, सोनोवाल यांनी आज चेन्नई येथे भारतीय सागरी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अनेक उपक्रमांची घोषणा केली.
“आज या महत्त्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून मला खूप आनंद होत आहे. भारताला आत्मनिर्भर बनण्यासाठी अमृत काळाच्या माध्यमातून कार्य करत असताना, भारताच्या विकास गाथेला पुढे नेण्यासाठी नील अर्थव्यवस्थेची अत्यंत मोठी भूमिका आहे.', असे सोनोवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. “नौवहन, समुद्र किनारी भागातील खनिज उत्खनन, मासेमारी, समुद्राखालील केबल आणि पर्यटन यांसारख्या पारंपरिक क्षेत्रांव्यतिरिक्त, सागरी संस्कृती, सागरी जैवतंत्रज्ञान, सागरी ऊर्जा आणि समुद्रातील खनिकर्म इत्यादीसारख्या आगामी क्षेत्रांमध्ये अधिकाधिक फायदा घेण्यासाठी आपण आपली अर्थव्यवस्था सुसज्ज केली पाहिजे. आपल्याकडील प्रतिभावान युवकांना आधुनिक सागरी तंत्रज्ञानाचे सर्वोत्तम ज्ञान आणि प्रशिक्षण देऊन हे केले जाऊ शकते, हे भारतीय सागरी विद्यापीठाच्या माध्यमातून शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील सर्वोत्तम ज्ञानाची ओळख करून देण्याच्या उद्देशाने प्रशिक्षण मॉड्यूल सुधारण्यासाठी,ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑफ अकॅडमिक नेटवर्क (जीआयएएन) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे.
तत्पूर्वी, भारतीय सागरी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात सर्बानंद सोनोवाल यांनी विविध विषयांत अव्वल स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना सुवर्ण आणि रौप्य पदके प्रदान केली.
***
S.Kane/S.Chavan/P.Kor
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1873820)
Visitor Counter : 171