कृषी मंत्रालय

कापणीपश्चात तण व्यवस्थापन ही प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी - केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर

Posted On: 04 NOV 2022 7:27PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली, भारतीय कृषी संशोधन संस्थेने शेतकऱ्यांनी अधिक चांगल्या आणि इष्टतम वापराच्या उद्देशाने भातपिकाचे कार्यक्षम व्यवस्थापन करण्यासाठी विकसित केलेल्या पुसा डिकंपोझरचे आज दिल्लीतील पुसा येथे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये शेकडो शेतकरी उपस्थित होते आणि हजारो शेतकरी देखील 60 कृषी विज्ञान केंद्रांद्वारे (KVKs) दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी  झाले होते.

डिकंपोझरचे तंत्रज्ञान पुसा संस्थेने यूपीएलसह इतर कंपन्यांकडे हस्तांतरित केले असून, त्याद्वारे ते उत्पादन करून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. याद्वारे गेल्या 3 वर्षात उत्तर प्रदेशात 26 लाख एकर, पंजाबमध्ये 5 लाख एकर, हरियाणामध्ये 3.5 लाख एकर आणि दिल्लीत 10 हजार एकरवर पुसा डिकंपोझरचा वापर आणि प्रात्यक्षिक केले गेले, ज्याचे खूप चांगले परिणाम मिळाले आहेत. हे डिकंपोझर स्वस्त आणि देशभरात सहज उपलब्ध आहे.

कार्यशाळेत केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, प्रदूषण रोखण्यासाठी भातपिकाच्या तणाचे योग्य व्यवस्थापन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या संबंधित राज्य सरकारांना केंद्राकडून 3 हजार कोटी रुपयांहून अधिक निधी पुरविण्यात आला असे त्यांनी सांगितले.

तोमर म्हणाले, या समस्येवर सर्वसमावेशक उपाय हा केंद्राने दिलेल्या सहाय्याने राज्यांना उपलब्ध केलेल्या 2.07 लाख यंत्रांचा पुरेपूर वापर करून शक्य आहे. तसेच पुसा संस्थेने विकसित केलेल्या पुसा डिकंपोझरचा वापर केल्यास समस्या सुटण्याबरोबरच लागवडयोग्य जमिनीची सुपीकताही वाढेल.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873813) Visitor Counter : 170