निती आयोग

अटल इनोव्हेशन मिशनच्यावतीने भारतातील 75 यशस्वी  उद्योजिकांची माहिती देणारे ‘कॉफी टेबल बुक’चे प्रकाशन

Posted On: 04 NOV 2022 6:44PM by PIB Mumbai

 

नीती आयोगाने अटल इनोव्हेशन मिशनअंतर्गत आज भारतातील 75 यशस्वी उद्योजिकांची माहिती  असलेल्या ‘इनोव्हेशन्स फॉर यू’ या कॉफी टेबल बुकची चौथी आवृत्ती प्रकाशित केली.

या 75 उद्योजिकांना नीती आयोगाच्या अटल इनक्युबेशन सेंटर्स (एआयसी) द्वारे पाठिंबा दिला जातो. देश स्वातंत्र्याचे 75 वे वर्ष साजरे करत असताना, ‘इनोव्हेशन्स फॉर यू’ या मालिकेव्दारे विविध क्षेत्रातील स्टार्टअप्स समुदायांसाठी शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी  नवनवीन लागलेले शोध कशा पद्धतीने आकाराला येत आहेत हे दाखवले जाते.

इनोव्हेशन्स फॉर यू' म्हणजेच तुमच्यासाठी नवोन्‍मेषी कल्पना, ही एक ‘कॉफी टेबल' पुस्तकांची मालिका आहे. या पुस्तकाच्या 3 आवृत्ती यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. पुस्तकात अटल इनक्युबेशन सेंटर्स, अटल कम्युनिटी इनोव्हेशन सेंटर्स आणि अटल न्यू इंडिया चॅलेंज, अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत तीन प्रमुख कार्यक्रमांद्वारे समर्थन केले जात असलेल्या स्टार्ट-अप्सच्या यशोगाथा आहेत. प्रत्येक आवृत्ती विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या उद्योजकांच्या प्रवासाचे दर्शन घडवते आणि नवीन, नाविन्यपूर्ण उत्पादने, सेवा आणि पर्याय  तयार करण्यासाठी समर्पित आहे.  शाश्वत भविष्यासाठी अशी उत्पादने  उपयुक्त ठरतात.

पहिली आवृत्ती आरोग्यसेवा क्षेत्रावर केंद्रित होती. दुसरा आवृत्ती  कृषी आणि संलग्न क्षेत्रावर आधारित होती आणि तिसरी वाहतूक आणि गतिशीलता, या विषयावर काढण्‍यात आली. एआयएमने समर्थन दिलेल्या 2900 हून अधिक स्टार्टअप्सपैकी 850 हून अधिक स्टार्टअप्सचे नेतृत्व महिला करत आहेत.

या पुस्तकाचे प्रकाशन करताना अटल इनोव्हेशन मिशनचे  डायरेक्टर डॉ.चिंतन वैष्णव म्हणाले, ‘नारी तू नारायणी’ ही आपल्या देशाची परंपरा आहे. ज्यांना भविष्‍यात या राष्ट्राचे नेतृत्व करण्‍याची इच्छा आहे, त्या सर्व महिलांना आम्ही हे पुस्तक  समर्पित करतो. येत्या दशकात भारतात काम करणार्‍यांची संख्या जगामध्‍ये  सर्वात मोठी असेल आणि भारताच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात महिलांचा असणारा  सहभाग महत्वाची भूमिका बजावेल.”

या पुस्तकाची  लिंक : https://aim.gov.in/CTB-75-womenpreneurs-of-India.pdf

***

S.Kane/S.Bedekar/P.Kor

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1873794) Visitor Counter : 170


Read this release in: English , Urdu , Hindi , Odia