राष्ट्रपती कार्यालय

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या शिष्टमंडळ प्रमुखांनी राष्ट्रपतींची घेतली भेट

Posted On: 29 OCT 2022 10:20PM by PIB Mumbai

 

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या शिष्टमंडळांच्या प्रमुखांनी आज – 29 ऑक्टोबर, 2022 रोजी राष्‍ट्रपती द्रौपदी मुर्मू  यांची राष्‍ट्रपती भवनामध्‍ये भेट घेतली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या विशेष बैठकीला उपस्थित राहण्‍यासाठी हे शिष्‍टमंडळ भारतामध्‍ये आले आहे. ही बैठक मुंबई आणि दिल्ली येथे दि. 28-29 ऑक्टोबरला आयोजित केली होती.

शिष्टमंडळाच्या सदस्यांचे स्वागत करतानाबैठकीच्या प्रारंभी  मुंबईतील 26/11च्या  बॉम्बस्फोटामध्‍ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण केल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांची  प्रशंसा केली.  त्या म्हणाल्या की, जगातील सर्वात मुक्त आणि वैविध्यपूर्ण समाज असलेला भारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. मात्र  अनेक दशकांपासून दहशतवादाचा बळी ठरला आहे. दहशतवादासारख्‍या वाईट प्रवृत्तीच्या विरोधात, आणि  अशा सर्व प्रकारच्या प्रकटीकरणाच्या विरोधात  लढण्यासाठी भारताची राष्ट्रीय वचनबद्धता आहे. दहशतवादाच्या कोणत्याही  कृत्याबद्दल शून्य सहिष्णूतात्यामागे असलेल्या  प्रेरणांचा विचार न करता, जागतिक दहशतवादविरोधी संरचनेला  आकार देण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाचा मार्गदर्शक दृष्टीकोन असला पाहिजेयावर  राष्‍ट्रपतींनी  भर दिला.

या बैठकीच्या वेळी, संयुक्त राष्‍ट्रामधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी, राजदूत रुचिरा कंबोज यांनी  दहशतवादविरोधी समितीच्या अध्यक्षा म्हणून, राष्ट्रपतींना संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या दहशतवादविरोधी समितीच्या (यूएनएससी सीटीसी) कार्याबद्दल आणि या समितीने दिलेल्या प्राधान्यक्रमाबद्दल माहिती दिली. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष मायकेल मौसा अ‍ॅडमो, गॅबनचे परराष्ट्र मंत्री आणि भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनीही संक्षिप्त स्वरूपामध्‍ये  यूएनएससी सीटीसीच्‍या महत्वाच्या पैलूंबद्दल आणि आज दिल्लीतील बैठकीत  स्वीकृत केलेल्या  घोषणापत्रातील पुढील मार्गांबद्दल राष्‍ट्रपतींना  माहिती  दिली. 

या बैठकीला उपस्थित मान्यवरांमध्ये घानाच्या परराष्ट्र मंत्री, सन्माननीय महोदया शर्ली अयोर्कर बॉचवे, यूएईच्या आंतरराष्ट्रीय सहकार राज्यमंत्री सन्‍माननीय महोदया रीम इब्राहिम अल हाशिमी, आणि अल्बेनियाच्या उपपरराष्ट्रमंत्री महोदया मेगी फिनो, संयुक्त राष्ट्र संघाचे वरिष्ठ अधिकारीसंयुक्त राष्ट्र संघाचे दहशतवाद विरोधी कार्यालयातील अंडर सेक्रेटरी जनरल’  व्लादिमीर वोरोन्कोव्ह यावेळी उपस्थित होते.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871898) Visitor Counter : 248


Read this release in: English , Urdu , Hindi