संरक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पूर्वावलोकन : गोवा सागरी परिसंवाद 2022

Posted On: 29 OCT 2022 6:44PM by PIB Mumbai

 

नौदल लष्करी महाविद्यालयातर्फे 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2022 या कालावधीत गोवा सागरी परिसंवाद आयोजित केला आहे. या परिसंवादात भारताबरोबरच बांगलादेश, कोमोरोस, इंडोनेशिया, मादागास्कर, मलेशिया, मालदीव, मॉरिशस, म्यानमार, सेशेल्स, सिंगापूर, श्रीलंका आणि थायलंड या  मैत्रीपूर्ण संबध असलेल्या देशांमधील कप्तान, कमांडर आणि नौदल किंवा सागरी दलांमधील अधिकारी भाग घेतील.

गोवा सागरी परिसंवाद हा भारतीय नौदलाने 2016 मध्ये मांडलेल्या विचारांना संस्थात्मक आकार देण्यासाठीचा मंच असून भारत आणि हिंद महासागर प्रदेशातील महत्वाचे देश यांच्यामध्ये सहयोगी विचार, सहकार्य आणि परस्परपूरक सहमती वाढीस लावणे हे त्याचे कार्य आहे. गोवा येथील नौदल लष्करी महाविद्यालयाकडून हा द्विवार्षि परिसंवाद आयोजित केला जातो. आतापर्यंत या परिसंवादाचे तीन वेळा आयोजन केले गेले आहे. यावर्षीच्या परिसंवादाचे उद्घाटन येथील नौदल लष्करी महाविद्यालयाचे कमांडट रिअर अडमिरल राजेश धनखड करतील.

हिंद महासागर प्रदेश हा 21 शतकातील धोरणात्मक आराखड्याचा महत्वाचा भाग बनत असतानाच अशा प्रकारचा परिसंवाद हा नीती, धोरण राबवणे आणि ते राबवताना सागरी प्रदेशातील सर्वंकष सुरक्षा या विषयांवर सर्व संबधितांना एकत्र आणण्याच्या दृष्टीने भरीव भूमिका बजावतो.

हिंद महासागर प्रदेशातील सागरी सुरक्षेतील आव्हाने : सर्वमान्य सागरी प्राथमिकता सहयोगाची चौकट  ही तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उल्लेखलेली सागरी सुरक्षेची पाच तत्वे ही या परिसंवादाची मुख्य संकल्पना आहे. या भागातील सर्वांसाठी संरक्षण आणि विकास यावर ही कल्पना आधारित आहे. यानुसार हिंदी महासागरप्रदेशातील सर्व देशांचे सागरी भवितव्य आणि आपल्या प्रदेशातील समृद्धी या परस्परावलंबी बाबी आहेत.

उत्तर गोव्यातील हिरव्यागार वातावरणात असलेला परिसंवादाचे ठिकाण हे गोव्याच्या दुसऱ्या शतकापासून असलेल्या समृद्ध सागरी परंपरेला योग्य सन्मान देणारेच आहे. परंपरेशी आणि भविष्यातील  आशा आकांक्षांशी एकाच वेळी जोडून घेणारे हे स्थळ गोवा सागरी परिसंवादातील चर्चासत्रांमध्ये अधिक आगळा आनंद वाढवणारे ठरेल. 

***

R.Aghor/V.Sahajrao/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871854) Visitor Counter : 168


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil