भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने ‘भूमिका, आराखडा आणि निवडणूक व्यवस्थापक संस्थांची क्षमता’ या संकल्पनेवर दोन दिवसीय आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन

Posted On: 29 OCT 2022 4:45PM by PIB Mumbai

 

निवडणूक आयोगाच्या वतीने नवी दिल्ली येथे रोल, फ्रेमवर्क अ‍ॅंड कपॅसिटी ऑफ इलेक्शन मॅनेजमेंट बॉडीज्म्हणजेच भूमिका, आराखडा आणि निवडणूक व्यवस्थापक संस्थांची क्षमताया संकल्पनेवर दोन दिवसांच्या  आंतरराष्‍ट्रीय परिषदेचे आयोजन केले आहे. भारतीय निवडणूक आयोग निवडणूक एकात्मताअखंडतेसाठी लोकशाही  समूहाचे नेतृत्व करीत आहे.  यासंदर्भात  डिसेंबर, 2021‘समिट फॉर डेमॉक्रसीम्हणजेच लोकशाहीसाठी शिखर परिषदेचे आयोजन केले होते. त्याचाच पाठपुरावा म्हणून आता या परिषदेचे आयोजन केले आहे.

2. दि. 31 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबर, 2022 रोजी होत असलेल्‍या या परिषदेचे उद्घाटन भारताचे मुख्‍य निवडणूक आयुक्‍त राजीव कुमार करणार आहेत. तर परिषदेचा समारोप कार्यक्रमाचे अध्‍यक्षपद  निवडणूक अखंडता समूहाचे नेतृत्व करणारे निवडणूक आयुक्‍त अनुपचंद्र पांडे भूषविणार आहेत. या परिषदेला सहकारी म्‍हणून ग्रीस, मॉरिशस आणि आयएफईएस यांना कोहार्टचे सह- नेतृत्व करण्‍यासाठी आमंत्रित केले आहे. निवडणूक आयोगाने यूएनडीपी म्हणजेच संयुक्‍त राष्‍ट्र विकास कार्यक्रम राबविणारी संस्‍था आणि आयडीईए म्‍हणजेच इंटरनॅशनल इन्स्‍टीट्यूट फॉर डेमॉक्रसी अॅंड इलेक्ट्रोल असिस्‍टंन्‍स संस्‍थांना आमंत्रित केले आहे. याशिवाय जगभरामध्ये निवडणुका घेण्याचे काम करणा-या  संबंधित सरकारी समकक्ष अधिका-यांनाही या परिषदेला आमंत्रित करण्‍यात आले आहे.

3. या परिषदेमध्‍ये अर्मेनिया, मॉरिशस, नेपाळ, काबो वेर्डे, ऑस्ट्रेलिया, चिली, मायक्रोनेशिया, ग्रीस, फिलीपिन्स, साओ टोमे आणि प्रिंसिपे, अमेरिका  आणि आयएफईएस, इंटरनॅशनल आयडीईए आणि यूएनडीपी या  तीन आंतरराष्ट्रीय संस्थांसह 11 देशांतील 50 प्रतिनिधी आणि त्यांचे  अकरा निवडणूक अधिकारी सहभागी होतील अशी अपेक्षा आहे. अनेक देशांचे नवी दिल्लीतील प्रतिनिधी त्यांच्या देशांचे मिशन म्हणून हजेरी लावतील.

4. पहिल्या दिवशी  पहिल्या दोन सत्रांमध्ये 'निवडणुकीची अखंडता' सुनिश्चित करण्यासाठी त्यांची भूमिका आणि आराखडा या संदर्भात ईएमबींना  भेडसावत असलेल्या समस्‍या, वर्तमान आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा करण्‍यात येईल.

 

पार्श्‍वभूमी :-

समिट फॉर डेमोक्रसीयासाठी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा पुढाकार घेवून डिसेंबर 2021 मध्ये त्याचे आयोजन केले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यामध्‍ये दि. 9  डिसेंबर 2021 रोजी लीडर्स प्लेनरी सेशनमध्ये भाषण केले होते.

'समिट फॉर डेमोक्रसी' च्‍या वर्षभरातील कार्यक्रमाचा एक भाग म्हणून, भारताच्या निवडणूक आयोगामार्फत, आपले ज्ञान, तांत्रिक कौशल्य आणि अनुभव जगातील इतर लोकशाहीवादी देशांबरोबर सामायिक करण्यासाठी 'डेमोक्रसी कॉहोर्ट ऑन इलेक्शन इंटेग्रिटी'चे भारत नेतृत्व करत आहे.

***

R.Aghor/S.Bedekar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1871820) Visitor Counter : 638


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu