पोलाद मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड येथे कल्पतरू – उद्योजकता केंद्र उद्योग 4.0 ची भागीदारी शिखर परिषद संपन्न

Posted On: 29 OCT 2022 12:15PM by PIB Mumbai

राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय , भारत सरकार, आंध्र प्रदेश सरकार आणि सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया  यांनी  विशाखापट्टणम स्टील प्लांट येथील आरआयएनएल येथे सामूहिकपणे उद्योग  4.0 संबंधी  उद्योजकता केंद्र  -कल्पतरू (सीओई  -कल्पतरू) स्थापन केले आहे. आरआयएनएलच्या उद्यमशीलता केंद्राची माहिती सामायिक  करण्यासाठी शुक्रवारी आरआयएनएल येथे भागीदारी शिखर परिषद आयोजित करण्यात आली होती.

कल्पतरू, सीओई इंडस्ट्री 4.0 चे प्रमुख मार्गदर्शक आणि आरआयएनएलचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अतुल भट्ट म्हणाले की आरआयएनएल येथील हे उद्योजकता केंद्र, पोलाद उद्योग तसेच इतर उद्योगांसाठी काम करण्यासाठी देशभरातील अनेक स्टार्ट-अप्स घेऊन येईल. आरआयएनएल येथील हे  केंद्र भारतीय पोलाद उद्योगाला डिजिटल उपाय  प्रदान करणारे  केंद्र बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी एसटीपीआयचे महासंचालक अरविंद कुमार यांनी भागीदार उद्योगांचे स्वागत केले आणि त्यांना या केंद्रासमवेत  सहभागी व्हायला सांगितले आणि त्यांच्या संस्थांमध्ये  इंडस्ट्री  4.0 ची लवकर अंमलबजावणी करण्याचे  लाभ  मिळवण्यास सांगितले. आरआयएनएल येथील हे 21वे सीओई  केंद्र असून  भारतीय उद्योगाला भेडसावणाऱ्या विविध आव्हानांवर उपाययोजना  उपलब्ध करून देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. "देशभरातल्या  शक्य तितक्या स्टार्ट-अपना सहाय्य पुरवणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे," असे अरविंद कुमार  म्हणाले.

***

NilimaC/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1871786) अभ्यागत कक्ष : 817