आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशातील कोविड-19 प्रतिबंधक एकूण लसीकरणाने केला 219.62कोटीचा टप्पा पार


12-14 वर्षे वयोगटातील 4.12 कोटीहून अधिक किशोरांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

देशातील एकूण उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्या 18,802

गेल्या 24 तासांत, 1,574 नवीन रूग्णांची नोंद

कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.77 टक्के

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.11 टक्के

Posted On: 29 OCT 2022 10:14AM by PIB Mumbai

आज सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार, भारतातील कोविड प्रतिबंधक लसीकरणाने 219.62 (2,19,62,18,338) कोटीचा टप्पा पार केला आहे. 16 मार्च 2022 पासून 12 ते 14 वयोगटासाठी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत, 4.12 कोटीहून (4,12,45,177) अधिक किशोरांना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे, 18-59 वयोगटातील लोकांना कोविड-19 खबरदारीची लसमात्रा देण्यास 10 एप्रिल 2022 पासून सुरूवात झाली.

सकाळी सात वाजेपर्यंत आलेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकत्रित आकड्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415403

2nd Dose

10120632

Precaution Dose

7074142

FLWs

1st Dose

18437159

2nd Dose

17720602

Precaution Dose

13751116

Age Group 12-14 years

1st Dose

41245177

2nd Dose

32380677

Age Group 15-18 years

1st Dose

62013310

2nd Dose

53341499

Age Group 18-44 years

1st Dose

561419168

2nd Dose

516339707

Precaution Dose

100768818

Age Group 45-59 years

1st Dose

204049103

2nd Dose

197079041

Precaution Dose

50787505

Over 60 years

1st Dose

127681623

2nd Dose

123221711

Precaution Dose

48371945

Precaution Dose

22,07,53,526

Total

2,19,62,18,338

 

भारतातील उपचाराधीन रूग्णांची संख्या सध्याच्या घडीला 18,802 इतकी आहे. तर उपचाराधीन रूग्णांचे प्रमाण एकूण रूग्णसंख्येच्या 0.04 टक्के इतके आहे.

परिणामस्वरूप, भारतातील कोविडमुक्त होण्याचा दर सध्याच्या घडीला 98.77 टक्के इतका आहे. गेल्या 24 तासांत, 2,161 रूग्ण कोविडमुक्त झाले असून कोविडमुक्त रूग्णांची एकत्रित संख्या(कोविड महामारी सुरू झाल्यापासून) आता 4,41,02,852 इतकी आहे.

गेल्या 24 तासांत, 1,574 नवीन रूग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत, 1,65,901 कोविड-19 चाचण्या भारतात पार पडल्या असून एकत्रित चाचण्यांची संख्य़ा आतापर्यंत 90.07 कोटी (90,07,25,697) इतकी आहे.

देशात साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 1.11 टक्के इतका असून दैनंदिन पॉझिटिव्हीटी दर 0.95 टक्के आहे.

***

NilimaC/UmeshK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1871780) Visitor Counter : 172