माहिती आणि प्रसारण मंत्रालय

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिवांनी विशेष अभियान 2.0 अंतर्गत नवी दिल्लीतील आकाशवाणी भवनातील स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला

Posted On: 28 OCT 2022 7:28PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर 2022

केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी आज म्हणजेच 27 ऑक्टोबर 2022 रोजी  दिल्लीतील, संसद भवन मार्गावरील आकाशवाणी भवन संकुलात विशेष अभियान 2.0 अंतर्गत, सुरु असलेल्या स्वच्छता मोहिमेचा आढावा घेतला. प्रसार भारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मयंक अग्रवाल, एएस आणि एफ ए चे जयंत सिन्हा, वरिष्ठ आर्थिक सल्लागार, आर. के. जेना, आणि आकाशवाणीतील इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

हा आढावा घेतांना, अपूर्व चंद्र यांनी, आकाशवाणीच्या विविध मजल्यांना भेट दिली.  तसेच, जिथे जुना, कालबाह्य कचरा साठला आहे, ई-कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशा सगळ्या ठिकाणांना भेट दिली. तसेच, आकाशवाणी भवनाच्या विविध अंतर्गत ठिकाणी असलेले कचऱ्याचे ढीग, मलबा आणि इमारतीचे नूतनीकरण करतांना टाकून दिलेल्या वस्तूंचे ढीग यांचीही त्यांनी पाहणी केली. डाक भवन प्रमाणेच , ह्या सगळ्या भागाचे नूतनीकरण करावे आणि तिथे फूड कोर्ट तयार करावे, अशी सूचना सचिवांनी यावेळी केली.

आकाशवाणीचे उपमहासंचालक जितेंद्र अरोरा यांनी स्वच्छता अभियान- 2.0 (SCPDM 2.0) अंतर्गत, आकाशवाणीच्या आजवरच्या उपलब्धीचे चित्रमय सादरीकरण केले.  आणि आकाशवाणीच्या विविध केंद्रांचे यश आणि साध्य केलेली उद्दिष्टे यांची माहिती त्यांनी दिली. कचरा आणि ई-कचऱ्याचा  लिलाव, जुनी वाहने मोडीत काढणे, प्रत्यक्ष फायली निकालात काढणे, इत्यादी कामांची माहिती दिली.

आकाशवाणीच्या विविध केंद्रांच्या काही विशेष उपलब्धी खालीलप्रमाणे :

  • सुमारे, 30000 किलो जुने फर्निचर, धातूची अडगळ, ई-कचरा, जुने/टाकावू एएम ट्रान्समीटर्स आणि स्टुडिओ उपकरणे इत्यादी निवडून त्याची विल्हेवाट लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे.
  • ई-कचरा आणि जुन्या फर्निचर आणि भंगाराच्या लिलावाद्वारे 2.5 कोटींहून अधिक महसूल  जमा झाला.
  • या स्वच्छता मोहिमेमुळे सुमारे 10000 चौरस फूट अंतर्गत  जागा मोकळी होण्याची  शक्यता आहे.
  • आकाशवाणीच्या विविध परिसरात उभ्या असलेल्या 100 जुन्या खराब वाहनांची ओळख पटविण्यात आली असून त्यांची विल्हेवाट किंवा लिलाव प्रक्रिया सुरू आहे
  • 50000 हून अधिक फाइल्सचे अवलोकन करण्यात आले असून निरुपयोगी फाईल्स बाहेर काढण्याची कार्यवाही सुरू आहे.
  • आकाशवाणी परिसरात वृक्षारोपणाची कामे सुरु आहेत.
  • ट्रान्समिटिंग साइट्सच्या एरियल फील्डमधील जंगली वेली कापण्याचे काम प्रगतीपथावर आहे
  • सीपीजीआरएएम पोर्टलवर सार्वजनिक तक्रारिंचे जलद गतीने निवारण करण्याची प्रक्रिया वेगाने सुरु आहे. 
  • स्वच्छता दिवस : आठवड्यातील एक दिवस विशेष साप्ताहिक स्वच्छतेसाठी निश्चित करण्यात आला आहे.
  • आंतर-कार्यालय स्वच्छता तपासणी नियमित अंतराने करण्याची पद्धत अवलंबली जात आहे
  • स्टेशन/कार्यालयांचे ऊर्जा लेखापरीक्षण चालू आहे.

माहिती आणि तंत्रज्ञान सचिवांनी, स्वच्छता मोहिमेच्या आजवरच्या प्रगतीविषयी आनंद व्यक्त केला तसेच, विशेष स्वच्छता अभियान 2.0 अंतर्गत साध्य  विशेष उपलब्धीचे कौतुक करत, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची सूचना केली.

 

S.Kane/R.Aghor/ P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 



(Release ID: 1871659) Visitor Counter : 147