आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

डॉ. मनसुख मांडवीय यांनी दुसऱ्या जी20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला केले संबोधित


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील भारत सरकार आरोग्य क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत आहे - डॉ. मनसुख मांडवीया

भविष्यासाठी सज्ज आणि लवचिक जागतिक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यायला भारत वचनबद्ध - केंद्रीय आरोग्य मंत्री

Posted On: 27 OCT 2022 6:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 ऑक्‍टोबर 2022

 

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत सरकार आरोग्य क्षेत्राला सर्वोच्च प्राधान्य देत आहे. जागतिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी अधिक चांगली   आणि आरोग्यदायी वसुंधरा मागे सोडून जाण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत”असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीया म्हणाले. ते आज इंडोनेशिया मधील बाली इथे दुसऱ्या जी20 आरोग्य मंत्र्यांच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रगती आणि प्राधान्य क्रमांबाबत चर्चा करणे, हे या बैठकीचे उद्दिष्ट आहे.      

यावेळी बोलताना डॉ. मनसुख मांडवीय म्हणाले की “भविष्यासाठी सज्ज आणि लवचीक आरोग्य सेवा परिसंस्था निर्माण करण्यासाठी मोठे योगदान द्यायला भारत वचनबद्ध आहे.” त्याच वेळी त्यांनी जागतिक स्तरावर आरोग्य विषयक लवचिकता निर्माण करण्याबाबत सविस्तर विवेचन केले, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय उपक्रमांना आर्थिक सहाय्य पुरवण्याच्या  प्रस्तावावर चर्चा झाली. जागतिक आरोग्य संरचनेमधील सध्याच्या त्रुटी समजून घेण्याची गरज,  तसेच आरोग्याबाबत आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वसमावेशक, जलद आणि प्रतिसाद देणारी चौकट निर्माण करण्याचे महत्व देखील त्यांनी अधोरेखित केले.    

डॉ. मांडवीया यांनी सर्व जी20 सदस्यांना, प्रस्तावित ग्लोबल फेडरेटेड पब्लिक ट्रस्ट डिरेक्टरीमध्ये त्यांच्या सार्वजनिक प्रणालीचे योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले, ज्यामुळे व्यक्ती आणि वस्तूंची अखंड गतिशीलता  सुनिश्चित होईल.

* * *

S.Kane/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1871329)