पंतप्रधान कार्यालय

येत्या 28 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यांच्या गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला पंतप्रधान रहाणार उपस्थित

Posted On: 26 OCT 2022 10:20AM by PIB Mumbai

पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी  येत्या 28 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 10:30 वाजता होणाऱ्या देशातील राज्यांच्या  गृहमंत्र्यांच्या चिंतन शिबिराला दृकश्राव्य माध्यमाद्वारे संबोधित करणार आहेत.हे चिंतन शिबिर दिनांक 27 आणि 28 ऑक्टोबर 2022 रोजी सूरजकुंडहरियाणा येथे आयोजित करण्यात आले आहे. राज्यांचे गृह सचिव आणि पोलीस महासंचालक (DGPs) तसेच केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) आणि केंद्रीय पोलीस संघटना (CPOs) यांचे महासंचालक हे देखील या  चिंतन शिबिरातही उपस्थित राहणार आहेत.

गृहमंत्र्यांचे  हे चिंतन शिबिर  पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी त्यांच्या भाषणात घोषित केलेल्या पंचप्रण धोरणानुसार देशाअंतर्गत सुरक्षेशी संबंधित बाबींवर विचार विनिमय करून राष्ट्रीय दृष्टीकोन तयार करण्यासाठी घेण्यात येत आहे.सहकारी संघराज्य या भावनेला प्राधान्य देत हे शिबिरकेंद्र आणि राज्य स्तरावरील विविध हितसंबंधितांमध्ये नियोजन आणि समन्वय साधण्याचा अधिकाधिक प्रयत्न करेल.

पोलीस दलाचे आधुनिकीकरणसायबर क्राईम व्यवस्थापनफौजदारी न्याय व्यवस्थेत आयटीचा वाढता वापरभू सीमा व्यवस्थापनकिनारी सुरक्षामहिला सुरक्षाअंमली पदार्थांची तस्करी यासारख्या मुद्द्यांवर या शिबिरात विचारमंथन होणार आहे.

***

JPS/SSP/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1870888) Visitor Counter : 183