संरक्षण मंत्रालय
लष्करप्रमुखांनी घेतला संरक्षणव्यवस्थेचा आढावा; सिक्किमच्या ऊत्तर सीमेवरील जवानांसोबत दिवाळी केली साजरी
Posted On:
24 OCT 2022 5:51PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,24 ऑक्टोबर 2022
लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी 23 आणि 24 ऑक्टोबर रोजी उत्तर बंगाल आणि सिक्किमच्या सीमेवरील लष्करी तळांना भेट दिली. त्यांनी सर्व रँकना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि सिक्किमच्या उत्तर सीमांसह सर्व ठिकाणच्या संरक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला. कर्तव्य बजावताना उच्च दर्जाची कार्यक्षमता आणि मनोबल राखल्याबद्द्ल लष्करप्रमुखांनी लष्करी तुकड्यांची प्रशंसा केली.
सीमाभागांमधील पायाभूत सुविधांच्या विकासाच्या गतीबद्दल लष्करप्रमुखांनी संतोष व्यक्त केला. पूर्व मुख्यालयाचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल आर पी कालिता, त्रिशक्ती कॉर्प्सचे GOC लेफ्टनंट जनरल तरुण कुमार ऐच हे यावेळी त्यांच्यासोबत होते.
23 ऑक्टोबरला सुकना लष्करी तळावर आगमन झाल्यावर लष्करप्रमुखांनी दिवाळीच्या पूर्वसंध्येला भारतातील सांस्कृतिक परंपरा आणि विविधतेतील एकता प्रदर्शित करणाऱ्या कार्यक्रमातील चमूसोबत संवाद साधला. समर्पण भावनेबद्दल त्यानी लष्करी तुकड्यांची प्रशंसा केली आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबियांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्य़ा. माउंट जोनसेंग आणि माउंट डोमखेंग या शिखरारोहणाबद्दल त्यांनी गिर्यारोहक चमूचे तसेच नुकत्याच महू इथे झालेल्या लष्कराच्या कौशल्य स्पर्धेत प्रथम आल्याबद्दल त्रिशक्ती कॉर्पचे अभिनंदन केले.
24 ऑक्टोबरला लष्करप्रमुखांनी आर्मी कमांडर आणि जीओसी यांच्यासह उत्तर आणि पूर्व सीमांवरील पुढील विभागांना भेट दिली. तेथील कार्य आणि तळावरील सिक्कीम सीमा भागातील उत्तर सीमांवर तैनात चमूच्या तयारीची आढावा घेतला. जवानांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आणि त्यांना मिठाई वाटली. व्यावसायिकता आणि कर्तव्याप्रती समर्पण भाव असल्याबद्दल सैनिकांचे त्यांनी कौतुक केले.
R.Aghor/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1870625)
Visitor Counter : 197