आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.56 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.12 कोटींपेक्षा जास्त किशोरवयीन लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 23,193

गेल्या 24 तासात 1,334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.95%

Posted On: 24 OCT 2022 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,24  ऑक्टोबर  2022

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.56 (2,19,56,41,807) कोटींची संख्या ओलांडली आहे. 

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.12 (4,12,35,971) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक खबरदारीच्या मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे.

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415381

2nd Dose

10120495

Precaution Dose

7069264

FLWs

1st Dose

18437131

2nd Dose

17720296

Precaution Dose

13745380

Age Group 12-14 years

1st Dose

41235971

2nd Dose

32343380

Age Group 15-18 years

1st Dose

62005842

2nd Dose

53318014

Age Group 18-44 years

1st Dose

561407594

2nd Dose

516294884

Precaution Dose

100502060

Age Group 45-59 years

1st Dose

204047787

2nd Dose

197070976

Precaution Dose

50688507

Over 60 years

1st Dose

127680842

2nd Dose

123216598

Precaution Dose

48321405

Precaution Dose

22,03,26,616

Total

2,19,56,41,807

भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या 23,193 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.05% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.  गेल्या 24 तासांत 1,557 रुग्ण कोविडमुक्त  झाल्यामुळे आतापर्यंत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची  एकूण संख्या (महामारीच्या सुरूवातीपासून ) वाढून 4,40,91,906 झाली आहे.

गेल्या 24 तासात 1,334 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली.

गेल्या 24 तासात एकूण 87,905 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 90.01 (90,00,85,711) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.95% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.52% आहे.

 


S.Patil/S.Patgaonkar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 1870611) Visitor Counter : 126