अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय प्रत्यक्ष कर नियंत्रण मंडळाचा (सीबीडीटी) रोजगार मेळा महाअभियानात सहभाग 

प्रविष्टि तिथि: 22 OCT 2022 4:58PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महा रोजगार भरती मेळाव्याला रोजगार मेळ्याला दूरदृष्य प्रणालीद्वारे सुरूवात केली. या मोहीमेदरम्यान, 10 लाख तरूणांची भरती करण्यात येण्याची अपेक्षा आहे. या मोहीमेच्या अंतर्गत देशभरातील विविध विभाग आणि मंत्रालयांमध्ये 75,000 तरूणांच्या पहिल्या तुकडीला नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.

याप्रसंगी पंतप्रधानांनी नवीन नियुक्ती मिळालेल्यांना संबोधित करताना त्यांचे अभिनंदन केले. सर्व नव नियुक्त उमेदवारांनी देशभरातून निवडलेल्या 50 स्थळे आणि केंद्रे किंवा दूरदृष्य प्रणालीद्वारे दिलेल्या लिंकवरून कार्यक्रमात सहभाग घेतला. संपूर्ण देशभरात 50 विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले होते आणि या केंद्रावर अनेक मान्यवरांनी नव्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली.

केंद्रीय अर्थ आणि कंपनी व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी चेन्नई येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्वीकारले. चेन्नई प्रदेशातील एकूण 57 तरूणांना प्राप्तीकर विभागात नियुक्त्या देण्यात आल्या. यापैकी 20 उमेदवार नियुक्तीपत्रे स्वीकारण्यासाठी प्रत्यक्षच उपस्थित होते. वित्तमंत्री सीतारामन यांनी प्राप्तीकर विभागात 3 नव्या उमेदवारांना (दोन निरीक्षक आणि एक कर सहाय्यक) नियुक्त्या दिल्या. या कार्यक्रमाला ते प्रत्यक्ष उपस्थित होते. उर्वरित उमेदवारांना कार्यक्रमात दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी होण्यासाठी लिंक सामायिक करण्यात आली.

सर्व मंत्रालये आणि विभागांना मिशन मोडमध्ये मंजूर केलेली रिक्त पदे भरण्याच्या दिशेने काम करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मिशन मोड नोकर भरती मोहीमेचा भाग म्हणून, प्राप्तीकर विभागानेही 1093 नव्याने नियुक्त केलेले प्राप्तीकर निरीक्षक आणि कर सहाय्यकांना 22 ऑक्टोबर 2022 रोजी नियुक्तीपत्रे जारी केली होती. त्यापैकी, 300 नव्या उमेदवारांनी सर्व 18 पीआर. सीसीआयटी सीसीए प्रदेशांत आयोजित केलेल्या कार्यक्रमांत प्रत्यक्ष सहभाग घेतला.

***

S.Thakur/U.Kulkarni/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1870262) आगंतुक पटल : 211
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil , Telugu