विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

जैवतंत्रज्ञान विभागातील प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठीची विशेष मोहीम 2.0

Posted On: 21 OCT 2022 9:22AM by PIB Mumbai

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचा जैवतंत्रज्ञान विभाग, ऑक्टोबर 2022 ते 31 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 'प्रलंबित बाबी निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम' (SCDPM 2.0) राबवत आहे. विभागाबरोबरच विभागाच्या स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांच्या इमारतीत आणि परिसरात स्वच्छता संबंधी उपक्रम राबवले जात आहेत. एकूण सतरा ठिकाणी (15 स्वायत्त संस्था आणि 2 सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम) ही मोहीम राबवली जाते आहे.

 

या मोहिमेतील काही यशोगाथा पुढीलप्रमाणे: मोहिम राबविण्यापूर्वीच्या आणि नंतरच्या छायाचित्रांचे 8 संच SCDPM 2.0 पोर्टलवर अपलोड, सुमारे 28000 चौरस फूट जागा मोकळी करणे. त्याशिवाय भंगाराच्या विल्हेवाटीतून 23.5 लाख रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. सुमारे 20,000 हजार फाइलींचे पुनरावलोकन करण्यात आले आहे आणि त्या निकाली काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जैवतंत्रज्ञान विभागाबरोबरच स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आपापल्या यशोगाथा नियमितपणे प्रसार माध्यमांवर प्रसिद्ध करत आहेत. आतापर्यंत 48 ट्विट करण्यात आली असून DARPG आणि इतर मंत्रालयांनी ती रिट्विट केली आहेत.

***

GopalC/Madhuri/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869840) Visitor Counter : 162


Read this release in: English , Urdu , Hindi , Tamil , Telugu