संरक्षण मंत्रालय
संरक्षण मंत्र्यांनी अमेरिकी कंपन्यांना भारतात उत्पादन केंद्रे उभारायला आणि असुरक्षिततेपासून मुक्त जागतिक पुरवठा साखळी तयार करण्यासाठी तंत्रज्ञान सहयोग विकसित करण्यासाठी आमंत्रित केले
Posted On:
20 OCT 2022 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2022
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अमेरिकी कंपन्यांना भारतात उत्पादन केंद्रे उभारायला आणि असुरक्षितता आणि अनिश्चिततेपासून मुक्त जागतिक पुरवठा साखळी निर्माण करण्यासाठी भारतीय कंपन्यांबरोबर तंत्रज्ञान सहयोग विकसित करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
गुजरातमधील गांधीनगर येथे 12 व्या डेफएक्स्पोचा भाग म्हणून ऑक्टोबर 20, 2022 रोजी यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (UIBC) आणि भारतीय संरक्षण उत्पादक संघ(SIDM) यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या परिसंवादाला संबोधित करताना ते बोलत होते. ‘न्यू फ्रंटियर्स इन यूएस-इंडिया डिफेन्स कोऑपरेशन: नेक्स्ट जनरेशन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन आणि मेक इन इंडिया’ या संकल्पनेवर हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय संरक्षण उद्योगाने प्रगतीशील सुधारणांच्या माध्यमातून गेल्या आठ वर्षांत परिवर्तनशील बदल पहिले आहेत. व्यवसाय सुलभतेसाठी पारदर्शकता, निश्चितता आणि संस्थात्मकता याद्वारे या सुधारणांनी भारतीय उद्योगाच्या विकासासाठी पोषक वातावरण निर्माण केले आहे, हे राजनाथ सिंह यांनी अधोरेखित केले.
संरक्षण मंत्र्यांनी यावर भर दिला की,‘आत्मनिर्भर भारताचा’ मार्ग धोरणात्मक चौकटीचा सर्वसमावेशक संच असून त्याला प्रस्थापित संस्था आणि मित्र देशांमधल्या उपकरणांच्या मूळ उत्पादकांबरोबरचे (OEMs) सहकार्य आणि सहभाग वाढवून, स्वदेशी तंत्रज्ञान आणि उत्पादनाची क्षमता आणि योग्यता विकसित करायची आहे. ते म्हणाले की, भारतीय बाजारपेठेसाठी तसेच मित्र देशांना निर्यात करण्यासाठी भारतात उत्पादन करणे, ही संकल्पना आहे, म्हणजेच, ‘मेक इन इंडिया, मेक फॉर द वर्ल्ड’.
“भारतीय सशस्त्र दलांच्या गरजा पूर्ण करणे हे मुख्य उद्दिष्ट असून; त्याच वेळी, जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशी OEM च्या जागतिक पुरवठा साखळीशी दीर्घकालीन संबंध प्रस्थापित करणे, हा देखील उद्देश आहे. या संबंधांद्वारे, आमचा देश आणि अमेरिकेसह आमच्या भागीदारांसाठी संरक्षण उपकरणे आणि इतर धोरणात्मक सामग्रीची अखंड आणि विश्वासार्ह उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी, भारताला मुक्त जगासाठी सुरक्षित आणि लवचिक जागतिक पुरवठा साखळीसाठी सहयोग करायचा आहे. भारताचा संरक्षण क्षेत्रात जसा विस्तार होईल, त्या अनुषंगाने अमेरिकेच्या खासगी क्षेत्रातील कंपन्या 'भारतात निर्मिती करणे' आणि 'भारतातून निर्यात करणे' या मोठ्या क्षमतांचा अंदाज घेऊ शकतील,” राजनाथ सिंह म्हणाले.
भारतीय उद्योगांच्या मोठ्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि परदेशी कंपन्यांना भारतात उत्पादन करायला आकर्षित करण्यासाठी खरेदी श्रेणींच्या संख्येत केलेल्या वृद्धीसह, हे लक्ष्य गाठण्याच्या दिशेने सरकारने उचललेल्या अनेक पावलांवर संरक्षण मंत्र्यांनी प्रकाश टाकला. “आमचे वाणिज्य आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी आणि भारतात उच्च-तंत्रज्ञानाची संरक्षण उत्पादन परिसंस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने अमेरिकी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी आमचे मोलाचे भागीदार असलेल्या युएस बरोबर काम करताना आम्हाला आनंद वाटत आहे. भारतासाठी, यूएस मधील कंपन्यांबरोबरचे सहकार्य हे, संपत्ती आणि रोजगार निर्मिती व्यतिरिक्त, धोरणात्मक शक्ती वाढवण्यासाठी महत्वाचे ठरेल,” ते म्हणाले.
राजनाथ सिंह यांनी, एफडीआय नियमांमधील शिथिलता आणि संरक्षण अधिग्रहण प्रक्रिया 2020 मधील खरेदी करा (भारतातील जागतिक निर्माता) म्हणजे, भारतीय संरक्षण उद्योगाने खुल्या केलेल्या संधींमध्ये सहभागी होण्यासाठी युएसच्या उद्योगांना दिलेले आमंत्रण असल्याचे म्हटले आहे. ‘मेक इन इंडिया’ या संधीचा लाभ घेण्यासाठी. यूएसमधील कंपन्या आता वैयक्तिकरित्या किंवा भारतीय कंपन्यांशी भागीदारी करून संयुक्त उपक्रम किंवा तंत्रज्ञान कराराद्वारे उत्पादन सुविधा उभारू शकतील, असे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना संरक्षण उत्पादनासाठी भारत हे आकर्षणाचे केंद्र वाटेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संरक्षण मंत्र्यांनी स्वदेशीकरणाची काही सकारात्मक उदाहरणे दिली, ज्यामध्ये उपकरणे/प्रणालींच्या विस्तृत यादीचा समावेश आहे, आणि म्हणाले की देशात संरक्षण उद्योगाचा परिपक्व पाया तयार करण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्वाचे पाऊल आहे. भारतातील उत्पादकांना मागणीचे आश्वासन देऊन, उपकरणे/प्रणालींच्या या यादीने तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षमतांमध्ये नवीन गुंतवणुकीला आकर्षित केले आहे आणि त्यामुळे देशातील संशोधन आणि विकासाला चालना मिळाली आहे, असे संरक्षण मंत्री म्हणाले.
* * *
S.Patil/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1869735)
Visitor Counter : 209