संरक्षण मंत्रालय
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची गुजरातमध्ये गांधीनगर इथे मादागास्कर, मोझाम्बिक, मंगोलिया आणि सुरीनाम या देशांच्या प्रतिनिधी मंडळाशी द्विपक्षीय चर्चा
Posted On:
20 OCT 2022 5:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर 2022
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज, 20 ऑक्टोबर 2022 रोजी गुजरातच्या गांधीनगर इथे, मादागास्कर, मोझाम्बिक, मंगोलिया अणि सुरीनाम या देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधीमंडळांशी द्विपक्षीय चर्चा केली. 12 डिफेन्स एक्सपोमध्ये सहभागी होण्यासाठी, तसेच, भारत-आफ्रिका संवाद आणि इंडियन ओशन रिजन कॉन्क्लेव्ह मध्ये सहभागी होण्यासाठी हे सगळे नेते सध्या भारतात गांधीनगर मध्ये आले आहेत.
या द्वीपक्षीय बैठकांदरम्यान राजनाथ सिंह यांनी मादागास्करचे संरक्षण मंत्री, लेफ्टनंट जनरल राकोटोनिरिना लिओन जीन रिचर्ड यांची भेट घेतली तसेच, मोझांबिकचे संरक्षण मंत्री क्रिस्टोवाओ आर्टुर चुमे, मंगोलियाचे संरक्षण मंत्री सायखानबायर गुरसेद आणि सुरीनामच्या संरक्षण मंत्री कृष्णकोमेरी माथोएरा, यांची भेट घेतली.
या सर्व बैठकांमध्ये संरक्षण सहकार्यासही संबंधित सर्व पैलूंवर सांगोपांग चर्चा झाली. त्यातही, परस्पर फायद्याच्या क्षेत्रात सहकार्य अधिक वाढवण्याचे नवे मार्ग विस्तारण्यावर भर देण्यात आला.
* * *
S.Patil/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1869607)
Visitor Counter : 196