गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय
प्रधानमंत्री शहरी आवास योजना ही जगातल्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण योजनांपैकी एक : केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप एस पुरी
प्रविष्टि तिथि:
20 OCT 2022 9:04AM by PIB Mumbai
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) ही जगातल्या सर्वात मोठ्या गृहनिर्माण योजनांपैकी एक म्हणून उदयाला आल्याचे केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायु मंत्री हरदीप एस पुरी यांनी म्हटले आहे.
ते आज राजकोट इथे प्रधान मंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) पुरस्कार 2021 च्या वितरण सोहळ्यात बोलत होते. या योजने अंतर्गत आतापर्यंत 1.23 कोटी घरे मंजूर झाली असून, ही संख्या 2004-2014 या आधीच्या 10 वर्षांच्या शासन काळात पूर्तता झालेल्या संख्येच्या जवळजवळ 9 पट आहे. आतापर्यंत 64 लाख घरे पूर्ण होऊन वितरित केली गेली आहेत, तर उर्वरित घरे देखील पूर्णत्वाच्या विविध टप्प्यांवर आहेत.
राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि युएलबी यांच्या अतुलनीय योगदानाचा पुरस्कार करण्यासाठी एमओएचयुए ने PMAY(U) योजनेच्या उत्कृष्ट अंमलबजावणीसाठी वार्षिक पुरस्कारांचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात PMAY(U) पुरस्कार 2021 च्या विजेत्यांना गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्री हरदीप एस पुरी यांनी सन्मानित केले. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास राज्य मंत्री कौशल किशोर, तामिळनाडू, गुजरात आणि आसाम या राज्यांचे नगरविकास मंत्री, एमओएचयुए चे सचीव मनोज जोशी आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते. त्याशिवाय, देशभरातली गृह बांधणी क्षेत्रातील भागधारक देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
प्रधानमंत्री आवास योजना-शहरी (PMAY-U) योजना हे सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्य भावनेचे उत्तम उदाहरण असल्याचे नमूद करून हरदीप एस पुरी यांनी हे निरीक्षण नोदावले की ही योजना सहकारी आणि स्पर्धात्मक संघराज्य भावनेचे उत्तम उदाहरण असून त्याला यश मिळावे, यासाठी सर्व राज्ये यामध्ये उत्साहाने सहभागी होत आहेत. ते म्हणाले की, गृहनिर्माण प्रकल्पांचे मूल्यांकन आणि मंजूरी देण्याच्या पूर्ण अधिकारांसह, आपले राज्य अव्वल स्थानावर यावे, यासाठी सर्व राज्यांमध्ये निरोगी स्पर्धा देखील राहिली. स्पर्धेचे अंतिम विजेते, आर्थिक दृष्ट्या कमकुवत (EWS) आणि अल्प उत्पन्न गटातील (LIG) वंचित लोकच आहेत. मंत्री पुढे म्हणाले की, विजेत्यांना पुरस्कार देण्याचा आजचा कार्यक्रम हा केवळ राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या प्रयत्नांचा सन्मान करण्याचा नसून, राज्ये/केंद्रशासित प्रदेशांनी दिलेल्या अखंड सहकार्याची पावती देण्याचा आणि त्यांच्या प्रति माझी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे.
मंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली जून 2015 मध्ये, प्रधान मंत्री आवास योजना-शहरी, स्मार्ट सिटी मिशन, शहरांचा कायापालट आणि परिवर्तनासाठीचे अटल मिशन (AMRUT) आणि त्यापूर्वीच सुरु करण्यात आलेला स्वच्छ भारत मिशन (शहरी) या प्रमुख मोहिमांनी, जगातल्या सर्वात व्यापक, सुनियोजित शहरीकरणाचा पाया घातला.
ते म्हणाले की, पंतप्रधानांच्या दूरदृष्टीमुळे स्वदेशी आणि जागतिक नवोन्मेषी बांधकाम तंत्रज्ञानाचा प्रचार करण्याच्या आणि त्याला मुख्य प्रवाहात आणण्याच्या प्रयत्नांवर सखोल विचारमंथनाला चालना मिळाली. हवामानाबाबतच्या गंभीर समस्यांशी तडजोड न करता बांधकामाचा वेग आणि गुणवत्ता सुनिश्चित करणे, हे या प्रयत्नांचे उद्दिष्ट होते.
या समारंभाच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने मार्च 2019 आणि ऑक्टोबर 2021 मध्ये अनुक्रमे, ग्लोबल हाउसिंग टेक्नॉलॉजी चॅलेंज-इंडिया (GHTC-India) आणि इंडियन हाउसिंग टेक्नॉलॉजी मेला (IHTM) चे आयोजन केले होते. राजकोटमध्ये यंदा आयोजित केलेले भारतीय गृहनिर्माण संमेलन हे याच मालिकेतील एक असल्याचे हरदीप एस पुरी यांनी सांगितले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी नवीन तंत्रज्ञान आणि बांधकाम साहित्यावरील प्रदर्शनाला जरून भेट द्यावी आणि ते शिकून त्याचा स्थानिक संदर्भात प्रयोग करावा, असे आवाहन त्यांनी केले.
पंतप्रधानांनी मे 2022 मध्ये उद्घाटन केलेल्या लाईट हाउस प्रकल्पाचे स्मरण करून मंत्री म्हणाले की, सहभागींना या सर्व तंत्रज्ञानाला खात्रीशीरपणे मुख्य प्रवाहात आणण्याचे निर्देश देऊन, पंतप्रधानांनी हे प्रयत्न पुढील टप्प्यावर नेले आहेत. आपल्या पुढील पिढीतील अभियंते या तंत्रज्ञानाशी परिचित व्हावेत, यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि नियोजकांसाठी या एलएचजीपीचे नियमित दौरे आयोजित करावेत असे निर्देश त्यांनी दिले.
***
Gopal C/R Agashe/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1869456)
आगंतुक पटल : 254