आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

भारताच्या एकूण कोविड -19 प्रतिबंधक लसीकरणाने 219.46 कोटी मात्रांची संख्या केली पार


12 ते 14 वयोगटातील 4.11 कोटींपेक्षा जास्त बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली

भारतातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या 25,510

गेल्या 24 तासात 2,141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.76%

सध्याचा साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर 0.97%

Posted On: 20 OCT 2022 9:57AM by PIB Mumbai

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने 219.46 (2,19,46,34,236) कोटींची संख्या ओलांडली आहे.   

देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील बालकांसाठी 16 मार्च 2022 रोजी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू झाली. आतापर्यंत 4.11 (4,11,94,276) कोटींपेक्षा अधिक किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 10 एप्रिल, 2022 पासून 18 ते 59 वयोगटातल्या नागरिकांसाठी कोविड-19 प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्‍यास प्रारंभ झाला आहे. 

आज सकाळी 7 वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:

 

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415361

2nd Dose

10120257

Precaution Dose

7063520

FLWs

1st Dose

18437087

2nd Dose

17719156

Precaution Dose

13734968

Age Group 12-14 years

1st Dose

41194276

2nd Dose

32245804

Age Group 15-18 years

1st Dose

61996247

2nd Dose

53280780

Age Group 18-44 years

1st Dose

561393284

2nd Dose

516225893

Precaution Dose

100059449

Age Group 45-59 years

1st Dose

204045908

2nd Dose

197057206

Precaution Dose

50524481

Over 60 years

1st Dose

127679730

2nd Dose

123207835

Precaution Dose

48232994

Precaution Dose

21,96,15,412

Total

2,19,46,34,236

 

भारतातील रुग्णसंख्या सध्या 25,510 इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत 0.6% इतकी आहे.

परिणामी, भारतात रुग्ण बरे होण्याचा दर 98.76% झाला आहे.  गेल्या 24 तासांत 2,579 कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (साथरोगाच्या सुरूवातीपासून ) वाढून 4,40,82,064 झाली आहे. 

गेल्या 24 तासात 2,141 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 

गेल्या 24 तासात एकूण 2,51,515 चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण 89.94 (89,94,39,208) कोटींपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.

साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.97% तर दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 0.85% आहे. 

***

Gopal C/Madhuri/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1869414) Visitor Counter : 150