अर्थ मंत्रालय

पीएफआरडीए च्या केंद्रीय नोंदणी संस्था (सीआरए) बनल्या ग्राहक (सभासद) केंद्रित ऑनलाईन सेवा देणाऱ्या डीजी लॉकर भागीदार संस्था


डीजी लॉकर द्वारे सक्षम निवृत्ती वेतन समाजाची उभारणी होणार

Posted On: 18 OCT 2022 5:15PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर 2022


निवृत्ती वेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाच्या (पीएफआरडीए) केंद्रीय नोंदणी संस्था (सीआरए) या ग्राहक (सभासद) केंद्रित ऑनलाईन सेवा देणाऱ्या डीजी लॉकर भागीदार संस्था बनल्या आहेत.   

भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त आयोजित स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचा भाग म्हणून, पीएफआरडीए डीजी लॉकरच्या माध्यमातून पुढील सेवा प्रदान करत आहे:

1. डीजी लॉकर द्वारे वाहन चालक परवाना (डीएल) वापरून खाते उघडणे.

2. डीजी लॉकर द्वारे डीएल वापरून विद्यमान पत्ता अद्ययावत करणे.

संभाव्य सभासदांना प्रोटीन सीआरए सह खाते उघडायला तसेच प्रोटीन सीआरए च्या विद्यमान सभासदांना आपला पत्ता अद्ययावत करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध आहे.  

भारतातला  निवृत्ती वेतन धारक समाज डिजिटली सशक्त समाजात परिवर्तीत करण्याचा  दृष्टीकोन असलेल्या भारत सरकारच्या डिजिटल इंडिया या प्रमुख कार्यक्रमा अंतर्गत डीजी लॉकर हा एक महत्वाचा उपक्रम आहे. डीजी लॉकर, नागरिकांना सहमती चौकटी अंतर्गत सामायिक करण्याजोगे खासगी डिजिटल स्पेस प्रदान करते आणि सर्व दस्तऐवज/प्रमाणपत्रे डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध करते, या द्वारे डीजी लॉकर डिजिटल इंडियाच्या दृष्टीकोनाची पूर्तता करते. डीजी लॉकरच्या नोंदणीकृत वापरकर्त्यांची संख्या जवळजवळ 13 कोटी इतकी आहे, तर  केंद्र/राज्य सरकारे, बँकिंग आणि विमा, शिक्षण, आरोग्य इ. विविध श्रेणी अंतर्गत 5.60 अब्ज दस्तऐवज जारी करण्यात आले आहेत.  

डिजीलॉकर अंतर्गत जारी केलेल्या वाहन चालक परवान्याचा वापर करून एनपीएस खाते उघडण्याचे टप्पे  

1. प्रोटीएन सीआरए वेबसाइटवर एनपीएस नोंदणी पृष्ठ उघडा. (https://enps.nsdl.com)

2. डीजी लॉकर मधील दस्तऐवज अंतर्गत नवीन नोंदणीचा पर्याय आणि त्यानंतर वाहन चालक परवाना (डीएल) हा पर्याय निवडा.

3. अर्ज डीजी लॉकर वेबसाईट वर पुनर्निर्देशित केला जाईल, जेथे आपल्या लॉगईन क्रेडेन्शियल्स सह लॉगईन करता येईल आणि आपले दस्तऐवज/माहिती सीआरए बरोबर शेअर करण्याची संमती देता येईल.

4. एनपीएस ला डीजी लॉकर आणि संबंधित कागदपत्रे उपलब्ध करण्याची संमती द्यावी.

5. खाते उघडण्याच्या पानावर वाहन परवान्याच्या आधारावर लोकसंख्याशास्त्रीय माहिती आणि छायाचित्र आपोआप प्रदर्शित होईल.

6. अर्ज पूर्ण करण्यासाठी पॅन(PAN), वैयक्तिक तपशील, बँक खात्याशी संबंधित माहिती, योजना आणि नामांकन आणि इतर माहिती प्रदान करा.

7. एनपीएस योगदानाची रक्कम जमा करावी.

8. एनपीएस खाते यशस्वीपणे उघडण्यात आले.         

 डिजीलॉकर द्वारे जारी केलेल्या वाहन चालक परवाना वापरून एनपीएस खात्यातील पत्ता अपडेट करण्यासाठीचे टप्पे  

1. प्रोटीन सीआरए वेबसाइटवरील क्रेडेन्शियल्स वापरून एनपीएस खात्यामध्ये लॉग इन करा.

2.  डेमोग्राफिक चेंजेस या टॅबखाली वैयक्तिक तपशील अपडेट करा हा पर्याय निवडा.

3. अद्ययावत पत्ता तपशील निवडा आणि पुढे डीजी लॉकरद्वारे पर्याय निवडा आणि दस्तऐवजांतर्गत ड्रायव्हिंग लायसन्स निवडा.

4. अर्जदाराला डिजीलॉकर वेबसाइटवर पुनर्निर्देशित केले जाईल, जिथे तो लॉगिन क्रेडेन्शियल्ससह लॉग इन करू शकतो आणि सीआरए सोबत कागदपत्रे/माहिती सामायिक करण्यासाठी संमती देऊ शकतो.

5. एनपीएसला डिजिलॉकर आणि जारी केलेले दस्तऐवज प्राप्त करण्याची आणि प्रदान  करण्याची परवानगी द्या.

6. वाहन चालक परवान्यानुसार पत्ता एनपीएस खात्यात अपडेट केला जाईल.

 

G.Chippalkatti/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1868875) Visitor Counter : 214