आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

भारताच्या समग्र कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेमध्ये आतापर्यंत लसीच्या 219 कोटी 37 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या


12 ते 14 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना देण्यात आलेल्या कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या पहिल्या मात्रांची संख्या 4 कोटी 11 लाखांहून अधिक

भारतातील सध्याची कोविड सक्रीय रुग्णसंख्या 26,449

गेल्या 24 तासांत देशात 1,542 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद

देशातील रोगमुक्ती दर सध्या 98.76%

साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.02% आहे

Posted On: 18 OCT 2022 10:14AM by PIB Mumbai

नवी दिल्ली 18 ऑक्टोबर 2022


आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, भारताच्या कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत देण्यात आलेल्या लसीच्या मात्रांनी  219 कोटी 37 लाखांची (2,19,37,66,738) संख्या ओलांडली आहे. 
 
देशातील 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलामुलींसाठीची कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण मोहीम 16 मार्च 2022 रोजी सुरु झाली. आतापर्यंत 4 कोटी 11 लाखांहून अधिक (4,11,60,467) किशोरवयीन मुलामुलींना कोविड-19 प्रतिबंधक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील वय वर्षे 18 ते 59 या गटातील नागरिकांना कोविड-19 लसीची खबरदारीची मात्रा देण्याचे अभियान देखील 10 एप्रिल 2022पासून  सुरु करण्यात आले आहे.

आज सकाळी 7 वाजता प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालातील आकडेवारीनुसार, आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधक लसीच्या एकूण मात्रांची गटनिहाय विगतवारी खालीलप्रमाणे आहे:

Cumulative Vaccine Dose Coverage

HCWs

1st Dose

10415338

2nd Dose

10120091

Precaution Dose

7059817

FLWs

1st Dose

18437045

2nd Dose

17718802

Precaution Dose

13725258

Age Group 12-14 years

1st Dose

41160467

2nd Dose

32157116

Age Group 15-18 years

1st Dose

61989913

2nd Dose

53256344

Age Group 18-44 years

1st Dose

561382322

2nd Dose

516178923

Precaution Dose

99664867

Age Group 45-59 years

1st Dose

204044350

2nd Dose

197047987

Precaution Dose

50372016

Over 60 years

1st Dose

127678800

2nd Dose

123200859

Precaution Dose

48156423

Precaution Dose

21,89,78,381

Total

2,19,37,66,738

 

सध्या भारतातील कोविड सक्रीय रुग्णसंख्या 26,449 इतकी आहे,  देशातील आतापर्यंतच्या एकूण कोविड बाधितांच्या तुलनेत ही सख्या 0.06% आहे.

परिणामी, भारतातील रोगमुक्ती दर आता 98.76% झाला आहे. गेल्या 24 तासांत 1,919 रुग्ण कोविड आजारातून बरे झाल्यामुळे, देशात महामारीची सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत कोविड-19 आजारातून पूर्णपणे बऱ्या झालेल्या रुग्णांची संख्या आता 4,40,77,068 झाली आहे.
 


 

गेल्या 24 तासांत, देशात नव्या 1,542 कोविड ग्रस्त रुग्णांची नोंद झाली.


गेल्या 24 तासांत देशात कोविड संसर्ग तपासण्यासाठी एकूण 2,27,207 चाचण्या करण्यात आल्या. देशात आतापर्यंत एकंदर 89 कोटी 89 लाखांहून अधिक (89,89,26,887) चाचण्या करण्यात आल्या आहेत.
देशात साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर सध्या 1.02% आहे आणि दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर 0.68%.इतका नोंदला गेला आहे.

 


***

Gopal C/Sanjana/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1868714) Visitor Counter : 170