कृषी मंत्रालय
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय आणि त्यांच्या विविध शाखांनी आज महिला किसान दिन साजरा केला
Posted On:
15 OCT 2022 8:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2022
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या, कृषी आणि शेतकरी कल्याण संचालनालयाचे, कृषीमधील स्त्री-पुरुष संसाधन राष्ट्रीय केंद्र (एनजीआरसीए), तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेली स्वायत्त संस्था, राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था यांनी संयुक्तपणे 15 ऑक्टोबर 2022 रोजी 'महिला किसान दिवस' किंवा 'आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन' साजरा केला.
संयुक्त राष्ट्रांनी 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून घोषित केले असल्याने यावर्षीच्या महिला किसान दिवसाची संकल्पना 'भरड धान्य : महिलांचे सक्षमीकरण आणि पोषण सुरक्षा प्रदान करणे" अशी आहे. या उदघाटनपर कार्यक्रमाचे आयोजन दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते आणि कार्यक्रमाचे तांत्रिक सत्र हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (MANAGE) द्वारे भारतीय भरड धान्य संशोधन संस्था (IIMR), हैदराबाद यांच्या तांत्रिक सहाय्याने आयोजित केले जात आहे.
2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून साजरे करण्याच्या भारत सरकारच्या ठरावाला 72 देशांनी समर्थन दिले आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने त्याचा स्वीकार करून 2023 हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष' म्हणून घोषित केले, असे कृषीमंत्री म्हणाले. भारतीय भरड धान्य, या धान्याच्या विविध पाककृती, मूल्यवर्धित उत्पादने जागतिक स्तरावर स्वीकारली जावीत यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष, 2023 हे जन चळवळ म्हणून साजरे करण्याचे घोषित केले आहे.
आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षामुळे, जागतिक स्तरावर भरड धान्याचे उत्पादन वाढवणे, कार्यक्षम प्रक्रिया आणि वापर सुनिश्चित करणे, पिकांच्या वारंवारतेचा उत्तम वापर करून घेणे, फूड बास्केटचा मुख्य घटक म्हणून भरड धान्याला प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण अन्न प्रणालींमध्ये उत्तम संपर्काला प्रोत्साहन देणे यासर्वांसाठी संधी उपलब्ध होऊ शकेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेनुसार महिलांना कृषी क्षेत्राच्या विकासात प्राधान्य देऊन त्यांना मुख्य प्रवाहात स्थान देण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध आहे, असे तोमर यांनी सांगितले. महिला या अन्नधान्याच्या प्राथमिक उत्पादक आहेत, जैवविविधतेच्या संरक्षक आहेत आणि भरड धान्य हे आपल्या स्वदेशी अन्न प्रणालीतील महत्त्वाचे अन्नधान्य आहे. भरड शेती जैवविविधतेचे रक्षण करते आणि महिला शेतकऱ्यांना प्रथम शेतकरी म्हणून आणि त्यापाठोपाठ स्वयंरोजगार करण्यासाठी सक्षम बनवते, त्यांच्यात आत्मविश्वास जागृत करून आपल्यासमोरील समस्या व्यवस्थितपणे मांडायला कणखर बनवते त्यामुळे भरड धान्यावर आधारित कृषी म्हणजे बदलत्या काळाशी सुसंगत आहे, असे तोमर यांनी सांगितले.
तोमर यांनी "भारतातील कृषी आणि अन्न प्रणालींमध्ये लिंग असमानता आधारित पुरावे" या पुस्तकाचे प्रकाशन केले. हे पुस्तक धोरणकर्ते , शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधकांना लिंग विश्लेषणाची गरज असलेल्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी उपयुक्त ठरेल.
* * *
S.Patil/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1868136)
Visitor Counter : 449