उपराष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सहभागी खेळाडूंमध्ये सौहार्द आणि राष्ट्रीय एकतेची भावना दृढ करते - उपराष्ट्रपती

Posted On: 12 OCT 2022 10:39PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12  ऑक्टोबर  2022

क्रीडा स्पर्धा राष्ट्र जोडण्याचे  काम करतात ज्यामधे राज्यभरातील खेळाडू एकत्र येतात आणि त्यांच्यात आयुष्यभराचे नातेसंबंध निर्माण करतात, त्याचबरोबरच त्यांच्यात सौहार्दाची मजबूत भावना निर्माण करतात असे उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले .

सुरत येथील पं. दीनदयाल  उपाध्याय इनडोअर स्टेडियमवर 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या  समारोप समारंभाला  ते आज संबोधित करत होते. या भव्य क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपराष्ट्रपतींनी राज्य सरकारचे अभिनंदन केले, ज्यात गेल्या काही आठवड्यांत विविध क्रीडा प्रकारात अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झालेले आपण पाहिले .  खेळाडू इथून गोड आठवणी आणि  राष्ट्रीयत्वाची नवी भावना सोबत घेऊन जातील, असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील क्रीडा विषयक पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या उल्लेखनीय प्रगतीचा  उल्लेख करत उपराष्ट्रपती  धनखड यांनी विश्वास व्यक्त केला की " तो दिवस आता दूर नाही जेव्हा भारत ऑलिम्पिकचे यजमानपद भूषवेल ." पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीची प्रशंसा करताना ते म्हणाले की, देशात उदयोन्मुख प्रतिभावान खेळाडूंना  योग्य संधी आणि योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी सर्वतोपरी  प्रयत्न केले जात आहेत. गुणवत्ता आणि पारदर्शक निवड आधारित नवीन क्रीडा संस्कृती आमूलाग्र बदल घडवत आहे , असे ते म्हणाले.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला,गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल, गुजरातचे  मंत्री आणि खासदार, सहभागी खेळाडू, अधिकारी  या क्रीडा स्पर्धेच्या समारोप समारंभाला उपस्थित होते.

 

 

 

 

S.Kane/V.Yadav/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1867300) Visitor Counter : 204


Read this release in: English , Urdu , Hindi , Gujarati