राष्ट्रपती कार्यालय

राष्ट्रपती त्रिपुरा दौऱ्यावर; त्रिपुरातील दळणवळणाचे जाळे मजबूत करणाऱ्या तसेच शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि उद्‌घाटन

Posted On: 12 OCT 2022 8:17PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 12  ऑक्टोबर  2022

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सध्या त्रिपुरा दौऱ्यावर असून त्यांच्या  हस्ते आज (12 ऑक्टोबर, 2022) नरसिंहगढ़, आगरतळा इथं त्रिपुरा राज्य न्यायिक अकादमीचे उद्घाटन आणि  त्रिपुरा राष्ट्रीय विधी विद्यापीठाची पायाभरणी झाली. 

तसेच आणखी एका कार्यक्रमात, राष्ट्रपतींनी आगरतळा इथल्या रवींद्र सातबार्षिकी भवन इथून कॅपिटल संकुलातील  आमदार वसतिगृहाच्या इमारतीचे आभासी पद्धतीने उद्घाटन केले . तसेच, महाराजा बिरेन्द्र किशोर माणिक्य संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र, आयआयआयटी आगरतळा तसेच  रस्ते, शाळा आणि वसतिगृहे अशा सरकारच्या विविध प्रकल्पांची पायाभरणी देखील त्यांनी केली.

आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमुळे त्रिपुरामधील संपर्कव्यवस्था आणि शिक्षण, न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ अशा संस्था मजबूत होतीलच, शिवाय  राज्याच्या समृद्ध संस्कृतीलाही त्यामुळे चालना मिळेल, असे रवींद्र सातबार्षिकी भवन येथे आयोजित कार्यक्रमात  राष्ट्रपती म्हणाल्या.

त्रिपुरा इथे राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या इमारतीची पायाभरणी करतांना आपल्याला विशेष आनंद होत आहे, असेही त्या म्हणाल्या. गेल्या तीन दशकात, त्रिपुराच्या राष्ट्रीय विधी विद्यापीठाने, कायद्याच्या शिक्षण क्षेत्रात अत्यंत महत्वाची भूमिका बजावली आहे. एनएलयु त्रिपुरा, केवळ ईशान्य भारतातच नाही तर देशभरात विधी शिक्षणात एक महत्वाचं केंद्र म्हणून विकसित होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

भारतातील तरुणांनी  माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात जगभरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. असं राष्ट्रपती म्हणाल्या. आगरतळा  येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे कायमस्वरूपी संकुल  माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवे मापदंड प्रस्थापित करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने त्रिपुरा राज्य सरकारच्या सहकार्याने 'विद्या-ज्योती मिशन 100' सुरू केले आहे, ज्या अंतर्गत 100 विद्यमान उच्च माध्यमिक शाळांचे अत्याधुनिक सुविधा असलेल्या दर्जेदार शिक्षण संस्थांमध्ये रूपांतरीत  केले जाईलयाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

ईशान्य भारतात विकासाची प्रचंड क्षमता आहे. आज महामार्ग, रेल्वे, हवाई मार्ग आणि जलमार्ग अशा विविध नवीन प्रकल्पांमुळे प्रदेशाच्या विकासाला नवी गती  मिळत आहे, असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

 S.Kane/R.Aghor/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 

 

 



(Release ID: 1867278) Visitor Counter : 200