वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
                
                
                
                
                
                    
                    
                        वाणिज्य मंत्र्यांनी 'गिफ्ट' विशेष आर्थिक क्षेत्राच्या कामकाजाचा घेतला आढावा 
                    
                    
                        
                    
                
                
                    Posted On:
                10 OCT 2022 7:25PM by PIB Mumbai
                
                
                
                
                
                
                नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2022
 
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग, ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण व  वस्त्रोद्योग मंत्री, पीयूष गोयल यांनी गुजरातमधील डीसी गिफ्ट (गुजरात इंटरनॅशनल फायनॅन्स टेक सिटी) कार्यालय आणि सेझ (विशेष आर्थिक क्षेत्र) संचालनाबाबतच्या नियामक बाबी आणि  गिफ्ट विशेष आर्थिक क्षेत्राच्या कामकाजाचा आज आढावा घेतला. गोयल यांनी  गिफ्ट सिटी येथे उद्योग प्रतिनिधींशी संवाद साधला.
“गिफ्ट सिटी  येथे उद्योग प्रतिनिधींशी फलदायी चर्चा झाली. येथे युनिट स्थापन करण्याच्या फायद्यांबाबत चर्चा केली. निर्यातीला प्रोत्साहन आणि उत्पादन क्षेत्रात 'मेक इन इंडिया' यासह इतर मुद्द्यांवर उत्कृष्ट सूचना मिळाल्या,” असे ट्विट गोयल यांनी बैठकीबाबत केले आहे.
सोन्याच्या व्यापाराशी संबंधित समस्या समजून घेण्यासाठी गोयल  यांनी गिफ्ट सिटीमधील इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज (IIBX-आंतरराष्ट्रीय सराफा विनिमय बाजार) येथे गोल्ड स्पॉट एक्सचेंज कार्यान्वित करणे आणि गिफ्ट आयएफएससी (आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र) द्वारे आभूषण  निर्यातदारांसाठी सोने धातू कर्जाची किंमत कमी करणे याबाबत संवाद साधला. 
“इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्स्चेंज (आयआयबीएक्स), गिफ्ट सिटी जगात वैशिष्ठ्यपूर्ण आहे. आयआयबीएक्सच्या माध्यमातून सोन्याच्या स्पर्धात्मक किमती शोधण्याचे आवाहन गोयल यांनी आभूषण  क्षेत्रातील प्रतिनिधींना केले. तसेच भारत-यूएई सीईपीए (सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार) मुळे संधींची कवाडे कशी खुली झाली आहेत, ते त्यांच्यासमोर स्पष्ट केले,'' असे ट्विट त्यांनी केले आहे. त्यांनी आयआयबीएक्सवर सोन्याचा व्यापार सुधारण्यासाठी निर्देशही जारी केले. 
गोयल यांनी गिफ्ट  सिटी येथे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरण (आयएफएससीए) च्या प्रतिनिधींची भेट घेतली आणि डीसी गिफ्ट सेझ  आणि आयएफएससीए  कार्यालयासोबत  विविध प्रशासकीय समस्यांचे निराकरण केले.
“भारताच्या विकासगाथेतून लाभान्वित होणाऱ्या जागतिक गुंतवणूकदारांसाठी व्यवसाय सुलभता वाढवण्यासोबत आर्थिक विकासाची गुरुकिल्ली आयएफएससी ठरेल'' असे ट्विट गोयल यांनी बैठकीबाबत केले आहे. 
 
 
 
 
 
 
 
 
* * *
S.Kane/S.Kakade/D.Rane
 
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai
@PIBMumbai    /PIBMumbai
 /PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai   pibmumbai[at]gmail[dot]com
pibmumbai[at]gmail[dot]com   /PIBMumbai
/PIBMumbai    /pibmumbai
 /pibmumbai
                
                
                
                
                
                (Release ID: 1866580)
                Visitor Counter : 227