राष्ट्रपती कार्यालय
पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 52 व्या दीक्षांत आणि शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला राष्ट्रपतींची उपस्थिती
Posted On:
09 OCT 2022 6:27PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज चंडीगढ येथील पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या 52 व्या दीक्षांत तसेच शताब्दी वर्षाच्या सांगता समारंभाला उपस्थित होत्या.
याप्रसंगी बोलताना, राष्ट्रपती म्हणाल्या की, 1921 मध्ये लाहोर येथे स्थापना झालेले पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालय आज संशोधनाच्या बाबतीत आघाडीची संस्था म्हणून उदयास आले आहे आणि जागतिक तंत्रज्ञान बदलांमध्ये या महाविद्यालयाने मोठे योगदान दिले आहे. ही संस्था म्हणजे देशातील एक प्रमुख संस्था असून या प्रदेशातील तांत्रिक शिक्षणात अग्रणी आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 मध्ये असे म्हटले आहे की, चांगली शैक्षणिक संस्था ती असते की जेथे प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत केले जाते आणि त्याची काळजी घेतली जाते. तसेच तेथे चांगल्या पायाभूत सुविधा आणि योग्य साधनसंपत्ती असल्यामुळे प्रेरणादायक वातावरण असते. या महाविद्यालयात हे सर्व गुण असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, हे महाविद्यालय सर्वोत्कृष्टतेकडे झेप घेईल. देशाच्या प्रगतीला चालना देण्यासाठी तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये मुलींची संख्या वाढवली पाहिजे.
पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना त्या म्हणाल्या की, अमर्याद संधीं आणि शक्यतांच्या प्रदेशात ते प्रवेश करत आहेत. संधींचे रूपांतर यशात आणि शक्यतांचे रूपांतर निश्चिततांमध्ये करण्यास विद्यार्थी सक्षम आहेत, याबद्दल शंका नाही. आयुष्यात काहीही होण्याचा त्यांनी निर्णय घेतला तरीही आपल्या मातृभूमीप्रति असलेली कर्तव्य कधीही विसरू नका, असा सल्ला त्यांनी दिला. या प्रतिष्ठित संस्थेत मिळवलेल्या ज्ञानाचा उपयोग मानवतेच्या सेवेसाठी ते करतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. महात्मा गांधी यांचा सर्वोदय संदेश आपल्या वैयक्तिक प्राधान्य यादीत ठेवण्याचे आवाहनही मुर्मू यांनी केले.
पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभापूर्वी राष्ट्रपतींनी चंडीगढ केंद्रशासित प्रदेशातील नूतन सचिवालय इमारतीचे उद्घाटन केले.
***
S.Kane/U.Kulkarni/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1866267)
Visitor Counter : 219