राष्ट्रपती कार्यालय
मिलाद ऊन नबीच्या पूर्व संध्येला राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
08 OCT 2022 9:31PM by PIB Mumbai
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी मिलाद ऊन नबीच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या शुभेच्छा संदेशात त्या म्हणाल्या की प्रेषित मोहम्मद यांच्या जन्मदिवसाच्या स्मरणार्थ साजरा केल्या जात असलेल्या ईद-ए-मिलाद अर्थात मिलाद ऊन नबी निमित्त मी देशाच्या सर्व नागरिकांना विशेषतः मुस्लिम बंधू आणि भगिनींना माझ्या शुभेच्छा देत आहे. प्रेषित मोहम्मद यांनी जगाला दया, साधेपणा आणि मानवसेवेचा संदेश दिला. त्यांचा संदेश आपल्या प्रत्येकाला एकता आणि बंधुत्वाच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो असं त्या म्हणाल्या. आपण हजरत मोहम्मद यांच्या जीवनावरून प्रेरणा घेत परस्परांमध्ये एकोपा राखत देशाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याची शपथ घेऊया असं त्यांनी सांगितलं.
***
S.Patil/S.Naik/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1866142)
आगंतुक पटल : 184