दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायकडून मसुदा दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा आंतरजोडणी (संबंधित यंत्रणा) (चौथी सुधारणा) विनियम, 2022' संदर्भात अभिप्राय पाठवण्यासाठीच्या मुदतीत वाढ
Posted On:
07 OCT 2022 8:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 ऑक्टोबर 2022
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) हितधारकांकडून अभिप्राय /प्रति-अभिप्राय प्राप्त करण्याच्या दृष्टीने, 9 सप्टेंबर 2022 रोजी, मसुदा दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा आंतरजोडणी (संबंधित यंत्रणा ) (चौथी सुधारणा) विनियम, 2022 जारी केला होता. हितसंबंधितांकडून लेखी अभिप्राय प्राप्त करण्याची अंतिम तारीख 7 ऑक्टोबर 2022 आणि प्रति-अभिप्राय असल्यास, 21 ऑक्टोबर 2022 पर्यंत निश्चित करण्यात आली होती.
हितधारकांनी मसुदा दूरसंचार (प्रसारण आणि केबल) सेवा आंतरजोडणी (संबंधित यंत्रणा ) (चौथी सुधारणा ) विनियम, 2022 वर त्यांचे अभिप्राय पाठवण्यासाठी मुदतवाढ मागितली होती. हे लक्षात घेता, लेखी अभिप्राय सादर करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तरादाखल देण्यात आलेले काही अभिप्राय असल्यास, 18 नोव्हेंबर 2022 पर्यंत देखील पाठवता येतील. मुदतवाढीसाठी पुढील कोणत्याही विनंत्या विचारात घेतल्या जाणार नाहीत.
advbcs-2@trai.gov.in आणि jtadv-bcs@trai.gov.in या ईमेलवर शक्यतो इलेक्ट्रॉनिक स्वरूपात अभिप्राय आणि प्रति-अभिप्राय पाठवता येतील. कोणतेही स्पष्टीकरण/माहितीसाठी, अनिल कुमार भारद्वाज, सल्लागार (प्रसारण आणि केबल सेवा) यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला जाऊ शकतो. दूरध्वनी क्रमांक: +91-11-23237922.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1865946)
Visitor Counter : 158